????सिने स्टाईल दारूच्या गाडीचा पाठलाग.
????रामनगर ठाणेतील दारूबंदी पथकाची कारवाई.
वर्धा : रामनगर ठाणे अंतर्गत येत असलेल्या उमरी मेघे येथील विदेशी व गावठी दारू पकडून एकास ताब्यात घेतले
सविस्तर असे कि नमुद घटना ता.वेळी व स्थळी पंच व पो.स्टाँप चे मदतीने यातील नमुद आरोपीवर नाकेबंदी करुन पंचासमक्ष प्रो.रेड केला असता.
*1) 180 एम.एल.च्या ओ सी ब्ल्यू कंपनीच्या सिलबंद 06 शिश्या प्रती नग 350/- रु. प्रमाणे 2100/- रु.
2) 180 ML च्या विदेशी ऑफिसर चॉईस कंपनीची 18 सिलबंद दारुच्या शिश्या प्रती नग 300/- रु. प्रमाणे 5400/-
3) तीन प्लास्टिक डबकीत प्रति डबकी 28 लिटर प्रमाणे एकूण 84 लिटर गावठी मोह दारू प्रति लिटर 200/- रु. प्रमाणे की. 16,800/-
4) तीन प्लास्टिक डबकी किंमत प्रति डबकी 200/- प्रमाणे 600/- रुपये
5)एक सिल्वर रंगाची होंडा कंपनीची होंडा सिटी गाडी किंमत 4,00,000/-
असा एकुण जुमला किमंत 4,24,900/- रु. चा माल* विनापास परवाना वाहतुक करताना मिळुन आल्याने आरोपी विरुध्द कलम 65 (अ),(ई),77(अ) म.दा.का. सहकलम3(1),181,139/177 मो.वा.का.अन्वये गुन्हा नोंद केला.
सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री. अजय भुसारी यांचे मार्गदर्शनात दारूबंदी पथकाचे अमंलदार यांना मुखबीर कडुन खात्रीशीर खबर मिळाल्याने नाकेबंदी करुन वृंदावन नगर शांती नगर वर्धा येथे नाकेबंदी करून सापळा रचून सदर आरोपी नामे 1) शुभम उर्फ प्रतीक विनोदराव सावळे वय 25 वर्षं राहणार ती गाव आमला ता.जि. वर्धा याचे वर प्रो.रेड केला असता यातील आरोपी यांने अवैद्यरित्या विनापास परवाना विदेशी व गावठी मोह दारुची वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने *त्याचे कडुन एकुण 4,25,900/- रु. चा माल मुद्देमाल* पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
*सदरची कार्यवाही मा.अनुराग जैन पोलीस अधिक्षक सा.जिल्हा वर्धा, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री.प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात श्री. अजय भुसारी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे निर्देशाप्रमाणे दारूबंदी पथकचे बंडू महाकाळकर,मुकेश वांदिले, विकी अणेराव, मनोज भोमले, यांनी केली आहे.*
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940