???? रोजमजुरी करणारे वाहन चालका वर गुन्हा दाखल. ???? वाहन मालकावर कोणाचा हाथ? ????16 गाड्या मधील कित्येक वाहने अनफिट?

वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर घाटातून वाळू माफिया अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती आहे असे असताना महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडावला जातो असल्याचे दिसून आले शेकापूर घाटाचा लिलाव न झाल्याने हिंगणघाट येथील नामांत लोकप्रतिनिधी व वाळू माफिया यांनी रात्रीच्या वेळी चोरीच्या मार्गाने हा घाट सुरू करून वाळूचा उपसा करत असल्याची माहिती पुलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांना मिळाली व यांच्या पथकाने घाटात छापेमारी करून वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली यामध्ये पंधरा ट्रक दोन टिप्पर एक कार असा एकूण 3 कोटी 74 लाख 2500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व अल्लीपूर ठाणे अंतर्गत येत असल्याने अल्लीपूर ठाणेदार यांच्या स्वाधीन केले तसेच 16 ट्रक चालकांवर गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये एका ही गाडी मालकावर संबंधित अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केलेला नाही.
वर्धा मध्ये वाळु घाटाचे लिलाव शासना मार्फत सध्याच बंद आहे. असे असले तरी रात्रीच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल विभागाचा महसूल बुडवून छाती ठोकपणे वाळू घाट चालवणाऱ्या वर वाळू उपसण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याचा हात आहे हे कळाला मार्ग नाहीअशी जिल्हाभर चर्चा आहे.तरी यामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी, तलाठी व बीट जमादार,पोलिस अधिकारी हे अनभिन्न आहे का? असा सवाल उठतो.
15 वाहन चालकांना अटक करण्यात आली आहे. अलीपुर ठाणेदार प्रफुल डाहुले यांनी वाहन चालकाला जरी विचारले असते की मालक कोण तर त्यांनी जागेवरच सांगितले असते गाड्यांचे दस्त तपासले असे तर वाहन मालक कोण हे माहिती त्यांना मिळाली असती. तरी कर्तव्यदक्ष अधिकारी डाहुले यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ताक्षर शिक्का असलेले वाहणाचे दस्त (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) ट्रक मध्ये मिळाले असते. महत्वाचे म्हणजे वाहणाच्या ऑनलाईन ऍप्प मध्ये माहिती घेतली असता काही गाड्यां अनफिट आहे काहींचे इन्शुरन्स नाही तर काही गाड्या लॅप्स झालेले आहे.
मजेशीर बाब म्हणजे एका वाहणाचा नंबर हा ट्रक चा नसून ई – रिक्षा चा असल्याचा दिसून आला. ही ऑनलाईन ऍप्लिकेशन ची चुकी की सत्य आहे हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे.
तरी ही वाहन मालकांवर साहेब कारवाई करतील कि ही पण माहिती मा. पोलीस अधीक्षक साहेबाना विचारावं लागेल असे.प्रतिनिधी नी विचारले असता ठाणेदार बोलले.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940