How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » एकात्मता रॅलीचा जिल्हा पोलिस अधिक्षकांच्याहस्ते शुभारंभ

एकात्मता रॅलीचा जिल्हा पोलिस अधिक्षकांच्याहस्ते शुभारंभ

 एकता दिनामित्त 5 किलोमीटरची पदयात्रा
 रॅलीत सहभागीतांचा प्रमाणपत्राने गौरव
वर्धा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून पोलिस विभागाच्यावतीने एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी उप वनसंरक्षक हरविर सिंग, वैद्यकिय जनजागृतीचे मंचचे डॉ. सचिन पावडे, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस उपअधिक्षक (गृह) पुंडलीक भटकर आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून एकता रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर 5 किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली. या रॅलीमध्ये पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सेवानिवृत्त पोलिस, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, निसर्ग सेवा समिती, खेळाडू व नागरिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करुन रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीमध्ये सहभागीतांसाठी 12 ते 18 वर्ष वयोगट, 18 ते 35 वर्ष वयोगट, 35 ते 50 वर्ष वयोगट व 50 वर्षाच्या वरील असे चार गट करण्यात आले होते. रॅलीमध्ये सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. सहभागी झालेल्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. प्राथमिक स्वरुपात गट निहाय प्रथम येणाऱ्या पाच सहभागार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते रॅलीच्या समारोप प्रसंगी सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरीत सहभागार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This