How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » कस्तुरबा संस्था व सेवाग्राम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश. मागण्या झाल्या पूर्ण.

कस्तुरबा संस्था व सेवाग्राम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश. मागण्या झाल्या पूर्ण.

कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटनेद्वारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांच्या नेतृत्वाखाली कस्तुरबा हेल्थ सोसायटी व त्याअंतर्गत येत असलेल्या सेवाग्राम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अर्चना फुलझेले,विजेंद्र नाईक,उज्वल भोंगाडे,आनंद ताकसांडे,लाला दिवेकर,रोहित मेश्राम हे सहा कर्मचारी
मागील १५ दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन व ८ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.

सर्व कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार घरभाडे भत्ता लागू करावा,
सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी कपात करण्यात यावी,भेदभाव न करता इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रायव्हेट रूमची सुविधा देण्यात यावी,
पूर्वी १२ व २४ वर्षांच्या सेवेनंतर मिळणारे लाभांच्या बदली सातवे वेतन आयोगानुसार ०१/०१/२०१६ पासून सुधारित सेवांतर्गत १० २०, ३० वर्षे सेवा कालावधीची आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावा,
संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर त्या निवृत्त कर्मचाऱ्याला संस्थेने विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ द्यावा,
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सात दिवस रात्रपाळीची ड्युटी झाल्यानंतर त्यांना नाईट ऑफ व साप्ताहिक सुट्टी मिळायला पाहिजे,
भविष्यात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वेळ व सन्मानजनक वागणूक द्यावी,
एखादा कर्मचारी कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटनेचा सदस्य असल्यास त्याच्यावर दबाब टाकू नये,
कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटनेला संस्थेच्या परिसरात कार्यालय उपलब्ध करून घ्यावे.
इत्यादी मागण्यांसाठी शेकडो कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावून मागील १५ दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन केले तसेच कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग दर्शवला.
सुरुवातीला कस्तुरबा संस्थेच्या प्रशासनाने आडमुठी भूमिका घेऊन प्रतिसाद दिला नाही.
मात्र कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग,वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक संघटनांनी दिलेला पाठींबा ,रुग्णालयात संप होऊन आंदोलन चिघळण्याची निर्माण झालेली शक्यता तसेच जिल्हा प्रशासनाने केलेली मध्यस्ती यामुळे १४ दिवस नंतर समेटाच्या बोलनीला सुरुवात झाली.
जिल्हाधिकाऱ्यांनी वर्धेचे उपविभागीय अधिकारी दीपक करंडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामेश्वर पराडकर,जिल्हा पोलीस उपायुक्त प्रमोद मुकेश्वर ,पोलीस उपायुक्त प्रतीक्षा खेतमाळीस ,तहसीलदार संदीप पुंडेकर या समितीच्या मध्यस्तीने कस्तुरबा संस्थेचे
सचिव बि. एस.गर्ग तसेच गिरीश देव व आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ ज्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे तसेच संदीप थुल,आशिष कांबळे,अजय कंकाळ,मयुरी खांदेतोड, अश्विनी कराळे इ.कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी या चर्चेमध्ये समेट घडून कस्तुरबा संस्थेने आंदोलनकर्त्यांच्या नऊ पैकी पाच मागण्या मंजूर केल्या व तीन मागण्यांचे प्रस्ताव होऊ घातलेल्या गव्हर्नमेंट कौन्सिलच्या मध्ये ठेऊन मंजूर करण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी व आंदोलनकर्त्यांना दिले.
त्यानंतर तीन वाजता कस्तुरबा संस्थेचे सचिव डॉ.बि.एस.गर्ग व पोलीस उपअधीक्षक प्रतीक्षा खेतमाळीस यांनी उपोषणकर्त्यांना फळांचा रस पाजून त्यांचे उपोषण संपुष्टात आणले.
त्यानंतर कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटनेच्या वतीने उपोषणकर्त्यांची वाजत-गाजत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी समारोपीय भाषणात व्यक्त होताना तुषार उमाळे बोलले की कस्तुरबा संस्थेने लेखी दिलेल्या मागण्या प्रामाणिकपणे पूर्ण कराव्या मात्र तसे न झाल्यास येत्या काळात पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
तसेच या आंदोलनात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे राजकीय क्षेत्रातील विविध पक्षांचे नेते,सामाजिक कार्यकर्ते,सेवाग्रामचे गावकरी,जिल्हा प्रशासन, पत्रकार बांधव यांचे तुषार उमाळे यांनी आभार व्यक्त केले.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This