वर्धा :- पिपरी मेघे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढत असलेले गुन्हेगारीचे प्रमाण यावर अंकुश लागावा याकरिता कारला परिसरातील चौकात सि. सि. टीव्ही. कॅमेरे लावणाची मागणी युवा संघर्ष सामाजिक संघटना पिपरी मेघे च्या वतीने स्थानिक राम नगर पोलीस स्टेशन चे निरीक्षक भुसारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ग्राम पंचायत पिंपरी मेघे ही जिल्ह्यातील क्षेत्रफळ आणि लोक संख्या नुसार सर्वात मोठी असलेले ग्राम पंचायत आहे, सदर ग्राम पंचायत चे हद्दीत मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालय तसेच दाट लोकवस्ती आहे. आर्वी नाका ते जुना पाणी चौक या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते तसेच यात शाळकरी, महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या मुली, नोकरी करणारा महिला वर्ग सोबतच ज्येष्ठ नागरिक रात्री उशिरा पर्यंत ये जा करताना दिसतात. परंतु या रस्त्यावर तसेच चौकात काही असामाजिक तत्वाचे लोक वावरतांना दिसून येत आहे. महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळी, चोरी, घरफोडी करणाऱ्या टोळी यांचा सुद्धा हौदोस वाढला आहे. मुलीची छेड काढणे, असे प्रकार नित्याचेच झाले आहे. यामुळे परिसरातील नारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारला चौक हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे आणि काही अनुचित प्रकार येथे पुन्हा भविष्यात घडू शकतात त्यामुळे अनुचित प्रकारस आळा बसवा तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या उड्डात हेतूने कारला चौक पिंपरी मेधे या परिसरा शहरी भागाप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीने सि. सि. टीव्ही. कॅमेरे बसविण्यात यावा करिता परिसरातील नागरिक तसेच युवा संघर्ष सामाजिक संघटचेच्या वतीने मागणी केली आहे. यावेळी
उमेश खांडेकर, आनंद धामणकर , गजानन वानखेडे, सुधीर वसु, गजानन भातकुलकर, अतुल पिसे, हरीश कनोजे, पराग पिंपळे, रमेश आंबटकर, गजानन पुरणकर, गजानन महाजन, नुकुल वाघमारे, अनिकेत पांढरे, गजू भोयर, निखिल मस्के, प्रशिल चरडे, प्रदीप क्षीरसागर, राजेंद्र सूर्यवंशी, मुकुंद अडसड, राहुल सरोदे, महेश भस्मे, गुणवंत घसाट, भगवान गडकरी, पद्माकर खेकडे, भरत मुडे, अनिल पुरी, विकी पिंपळे, प्रणव साठवणे, रजत धुर्वे, दिनेश घोडे, मोहन मोहिते, झलके साहेब, अरविंद साहारे, पुंडलिक राऊत, शिवाजी काकर, ठाकूर, तसेच परिसरातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940