वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमसडा गावात शेतीच्या वादातून पुतण्याने कु-हाडीने डोक्यावर वार करून काकू व चुलतभाऊ या दोघांची निर्घृण हत्या करून स्वता विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राप्त माहितीनुसार २८ जुन रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मृत्यक आरोपी महिंद्रा मोहिते वय ५६ वर्ष राहणार निमसडा यांने शेतामध्ये पेरणीच्या वादातून सख्या काकू साधना सुभाष मोहीजे वय ५५ वर्ष व सखा चुलत भाऊ नितीन सुभाष मोहिजे वय २७ वर्ष या दोघांनाही शेतामध्ये शेतीच्या पेरणीच्या वादावरून आरोपी महिंद्रा भाऊराव मोहिजे यांने ने डोक्यावर वार करून ठार केले दोघांना ठार केले आहे .
या घटनेची माहिती अल्लीपूर येथील ठाणेदार विजय घुले यांना मिळताच त्यांनी पोलीस अधीक्षक अनुराग जैन, पोलीस अप्पर अधीक्षक सागर कवडे, पोलीस उपविभागीय अधिकारी राहूल चव्हान यांच्या मार्गदर्शनात अंतर्ग घटनास्थळी पोलीस टीमसह गाठले व पंचनामा केला असून संविच्छेदना करता वर्धा येथील शासकीय रुग्णालयामध्ये शव पाठवले आहे .
पुढील तपास अल्लीपूर येथील ठाणेदार विजय घुले करीत हे करीत आहे .
शेतामध्ये ही घटना झाल्यानंतर आरोपी महेंद्र भाऊराव मोहिते यांने शेतामध्ये ठेवून असलेले स्वतः विश प्राशन केले त्याला उपचाराकरता सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा सुद्धा मृत्यु झाला या प्रकरणाचा पुढील तपास अल्लीपुर येथील ठाणेदार विजय घुले करीत आहे.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940