वर्धा, दि.16 (जिमाका) : दिवाळी सण साजरा करतांना नागरिकांनी आग सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, आरोग्य आणि आपत्कालीन तयार, इमारत व विद्युत सुरक्षा बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश खताळे यांनी केले आहे.
आग सुरक्षा – फक्त परवानाधाक फटाके विक्रेत्यांकडून फटाके खरेदी करावे, फटाके मोकळ्या जागेत आणि ज्वलनशील वस्तूपासून दूर फोडावे, जवळ पाण्याची बादली, वाळू आणि अग्नशामक यंत्र ठेवा, मुलांना फटाके फोडतांना प्रौढांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. कापसाचे कपडे वापरा, कारण ते आग पसवरण्याचा धोका कमी करतात. फटाके फोडायला अगरबत्ती अथवा मोमबत्ती वापरा.
पर्यावरण सुरक्षा – इको फ्रेंडली दिवाळी साजरी करा, सामुहिक कार्यक्रम आयोजित करा, ज्यामुळे वैयक्तिक फटाक्यांचा वापर कमी होतो. फटाक्यांचा कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट लावा.
आरोग्य आणि आपत्कालीन तयारी – प्राथमिक उपचार पेटी जवळ ठेवा, जवळचे रुग्णालय आणि आपत्कालीन क्रमांक माहिती ठेवा. मोठ्या कार्यक्रमांची माहिती स्थानिक प्रशासनाला द्या, फटाक्यांमुळे निर्माण होणारे प्रखर प्रकाश आणि स्फोटातून उडणारे घातक रायायनिक कण यामुळे डोळ्याला गंभीर दुखापत होऊ शकते. यासाठी सुरक्षित अंतरावरुन फटाके हाताळा आणि शक्य असल्यास संरक्षित चष्मा घाला. किरकोळ भाजलेले अथवा लासलेला भाग थंड पाण्याने लगेच धुआ, फटाक्यातून निर्माण होणारा धूर नाका तोंडावाटे शरीरात जाऊन निर्माण होणाऱ्या दमा तसेच श्वसनाच्या इतर समस्या टाळण्यासाठी सुरक्षित मास्कचा वापर करा.
इमारत व विद्युत सुरक्षा – सर्व विद्युत सजावट तपासा, शार्ट सर्किट किंवा ओव्हरलोड होऊ नये, प्रमाणित विद्युत उपकरणे वापरा, तात्पुरती वायरिंग टाळा, निर्गमन मार्ग सजावटीमुळे अडवू नका. घरात पुजा तसेच सजावटीसाठी पेटवलेले दिवे अथवा मेणबत्या ज्वलनशील पदार्थांजवळ ठेऊ नका, फटाक्यांपासून अचानक निर्माण होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे कानाला दुखापत अथवा श्रवणशक्ती कमी होऊ नये याकरीता कानात कापूस घाला. कान झाका, आणि शक्य असल्यास विना आवाजाचे फटाके वापरा. दिवाळीच्या उत्सवादरम्यान आवश्यकता नसल्यास घरातील गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर बंद करा.
आग आणि दुखापत टाळा – फटाके कोरड्या झाडाझूडपाजवळ, गॅस सिलेंडर किंवा वाहनाजवळ फोडू नये, मुलांना फटाके एकटे फोडू देऊ नये, न फुटलेले फटाके पुन्हा पेटवू नका त्यांना पाण्यात टाका, फटाके फोडायला माचीस किंवा लाइटर वापरु नये, फटाका फोडतांना इतर फटाके जवळपास ठेऊ नका, मोठी झाडे किंवा विजेचे तार असलेल्या जागी रॉकेट किंवा हवेत फुटणारे फटाके फोडू नका.
पर्यावरणीय धोके – बंद किंवा गर्दीच्या जागेत कचरा किंवा फटाके जाळू नका, अत्यंत आवाज करणारे फटाके वापरु नका, ध्वनी प्रदुषण नियमांचे पालन करा, फटाक्यांच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा.
आरोग्य आणि सुरक्षा – जळजळ, श्वासोच्छवासाचा त्रास किंवा डोळ्यांची दुखापतीकडे दुर्लक्ष करु नका, आपत्कालीन मार्ग वाहन किंवा सजावटीमुळे अडवू नका, जास्त दिवे एका सॉकेटमध्ये लावून विद्युत ओव्हरलोड करु नका, भाजलेल्या जागी टूथपेष्ट किंवा बर्फ लावू नये, प्राण्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांचा जवळपास फटाके फोडू नका, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कळविले आहे
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940