How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » न्यू म्हाडा कॉलनी वॉर्ड नं 6 येथे पिपरी मेघे येथे शारदा माते ची स्थापना

न्यू म्हाडा कॉलनी वॉर्ड नं 6 येथे पिपरी मेघे येथे शारदा माते ची स्थापना

वर्धा : जय अंबे… जय दूर्गेचा गजरात ढोलताशाचा निनाद, अन् गुलालाची उधळण, तर देवीच्या स्थापना होणार असलेल्या मंडपात मंत्रघोष अशा भक्ती व चैतन्यमय वातावरणात पिपरी मेघे येथे शनिवारी जल्लोषात शारदा मातेची स्थापना करण्यात आली. देवीच्या स्वागताला वर्षाराणीही सज्ज झाल्यांने भक्तांमध्ये नवा उत्साह संचारला होता. अधून मधून येत असलेला पाऊस व या पावसापासून उघड्यावर नेत असलेल्या देवीची मूर्ती बचावाकरिता भाविकांना चांगलीच कसरत करावी लागली.
या सर्व परिस्थितीवर मात करीत वाजत गाजत मिरवणूक काढत देवीच्या मूर्तीला मंडपांमध्ये आसनस्थ करण्यात आले. स्त्रीशक्तीचा सन्मान करीत शारदा मातेचा जागर शनिवारपासून सुरू झाला असून पुढील दहा दिवस हा जागर सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात नवयुवक शारदा माता सार्वजनिक मंडळाच्यावतीने देवीची स्थापना केलेली आहे.
वर्धा शहरातील लागून असलेल्या पिपरी मेघे ग्रामपंचायत अंतर्गत शारदेय उत्सव प्रसिद्ध आहे. एक वेगळी सांस्कृतिक ओळख या उत्सवाला आहे.
जिल्ह्यात एकमेव मंडळांद्वारे 16 फूट उंच देवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे . हा उत्सव ग्रीष्म ॠतूत येथील नवयुवक शारदा मंडळ पिपरी मेघे मानत असल्यामुळे लोकांन मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मिरवणूक, अंबेचा गजर, ढोलताशाचा निनाद करत मातेचे आगमन पिपरी परिसरात पहायला मिळाला असल्याचे पिपरी वासियात चर्चेचा विषय ठरला आहे. मानाच्या समजल्या जात असलेल्या शारदा मातेची विधीवत स्थापना करण्यात आली. यंदाचा शारदेय उत्सव हा संपूर्ण दहा दिवसाचा असल्याने हा आनंद द्विगणीत झाला आहे. नवयुवक शारदा मंडळाच्यावतीने सुंदर असा देखावा मंडपा मध्ये करण्याचे काम मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This