????सरपंच गावात असून सुद्धा कार्यक्रमात गैरहजर .
????भाजप चे शेख,वानखेडे,शेंडे,सरपंच्या वर नाराज का?
वर्धा (सचिन ओली ): पिपरी मेघे ही जिल्ह्यात लोक संख्येच्या मानाने सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. 2011च्या जनगणनेनुसार 21 हजार 700 अंदाजे लोकसंख्या आहे. व ही ग्रामपंचायत शहरा लगत असल्याने येथे सुशिक्षित मतदार मोठया प्रमाणात आहे.

या ग्रामपंचायत मध्ये गौळकर विरुद्ध शिंदे अशी वर्चस्वाची लढाई नेहमी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये पाहायला मिळते. अश्यातच आज वर्ध्याचे पालकमंत्री श्री पंकज भोयर यांच्या हस्ते वॉर्ड नं 1 मध्ये जगतगुरु श्री प्रभु विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त पिपरी मेघे ग्रामपंचायत येथील ITI टेकडी गजानन नगर येथे शेड लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शेडचे लोकार्पण केले. पण या सर्व सोहळा मध्ये पिपरी मेघे तील भाजप ने मात्र लोकनियुक्त सरपंच सौ वैशाली अजय गौळकार यांना लोकार्पणा पासून वंचित ठेवले असे आज दिसून आले.

तरी पिपरी ग्रामपंचायत मध्ये सदस्य संख्या एकूण 17 आहे त्या पैकी काँग्रेस चे संजय शिंदे गटाचे 9 सदस्य आहे आणि अजय गौळकर यांचे 8 सदस्य व सरपंच आहे असे असताना गौळकार हे वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर यांचे खंदे समर्थक आहे. त्यामुळे पिपरी मेघे च्या भाजपला अजय गौळकर यांचा तिरस्कार तर नाही ना अशी शंका पिपरी मेघे येथील नागरिकांना आहे कारण वॉर्ड नं 1 मधील या विकास कामासाठी पिपरीतील भाजप ने बॅनर बाजी केली होती असे दिसून आले. असे असताना ग्रामपंचायत सदस्य प्रदीप रोंदळे व वैशाली नोहाटे हे संजय शिंदे यांच्या गटा चे आहे तरी या दोघांना कार्यक्रमाचे निमंत्रण असल्याचे दिसून येते पण या कार्यक्रमा मध्ये गावाचे सरपंच गौळकर दिसून आल्या नाही असे का ? पिपरी मेघे ची भाजप ही काँग्रेस च्या संजय शिंदे यांच्यासोबत तर नाही ना असे दिसून येते भाजप चे शेंडे, शेख, व वानखेडे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित दिसत होते. म्हणून पिपरी मेघे ची भाजप सरपंच्या वर नाराज तर नाही ना!
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940