वर्धा, दि. ०6 ऑगस्ट २०२५ –
भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीची (भाजयुमो) नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली त्यात नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. भाजपाचे नेते माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, वर्धा जिल्हा पालकमंत्री व राज्यमंत्री श्री.डॉ. पंकजजी भोयर, राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण, विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष श्री संजयजी गाते यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. त्या मध्ये वर्धा जिल्हा अध्यक्षपदी पृथ्वीराज शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाच्या युवा संघटनेमध्ये सक्रिय सहभाग व नेतृत्वगुण लक्षात घेता पृथ्वीराज शिंदे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वर्धा जिल्ह्यात भाजपाच्या युवा कार्याला नवीन दिशा मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज शिंदे म्हणाले,
> “भाजप नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. युवा पिढीला राष्ट्रहिताच्या दिशेने सक्रिय करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
पृथ्वीराज शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रीय असून, त्यांनी युवकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत ही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.
पक्षाच्या विविध वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940