How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » बनावट नोट प्रकरणात वर्धा पोलिसांची मोठी कारवाई!

बनावट नोट प्रकरणात वर्धा पोलिसांची मोठी कारवाई!

वर्धा : शहरात एका खळबळजनक घटनेत वर्धा पोलिसांना बनावट नोटा तयार करणारा छापखाना आढळला आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून ४ लाखाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आले आहे. दोन आरोपीना मालेगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांना वर्धा पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सूरू आहे.

Oplus_131072

स्थानिक गोंडप्लॉट भागातील केजाजी चौकात डॉ. प्रकाश तळवेकर यांचे घर आहे. या घराच्या वरच्या मजल्यावर किरायाने राहण्यास आलेल्या भामटयांनी हा प्रकार केला. आज पहाटे १ वाजता कारवाई करण्यात आली. या छाप्यात पाचशेच्या १४४ बनावट नोटा सापडल्या. तसेच प्रिंटर, लाकडी फ्रेम, एक काचेची चौकट, ए फोर आकाराचे कागद, शाईची बॉटल व अन्य साहित्य सापडले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ईश्वर लालसिंग यादव हा फरार झाला. त्याचे दोन साथीदार धनराज धोटे व राहूल आंबटकर रा. कारला परिसर यांना माळेगाव येथे अटक झाली आहे. किरायाच्या घरी एक विधिसंघर्षित बालक सापडला असून त्यालाही ताब्यात घेण्यात आले. माळेगाव येथे सापडलेले आरोपी हे बनावट नोटा चलनात आणण्याच्या कामात लागले होते. ज्येष्ठ नागरिक, वयस्क दुकानदार यांच्याशी हे भामटे व्यवहार करीत बनावट नोटा चलनात आणत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालेगाव पोलिसांना या प्रकरणाचा छडा लागला. त्यांनी दोन आरोपीना अटक केली. त्यांची चौकशी केल्यावर छपखाना वर्ध्यात असल्याची कबुली मिळाली. तसेच नेमके लोकेशन कळले. तेव्हा वर्धा पोलिसांच्या तीन चमू गठीत करण्यात आल्या. त्यांनीच धाड टाकली. साथीदार पोलिसांच्या तावडीत सापडल्याची कुणकुण लागतच मुख्य आरोपी यादव हा पोलीस येण्याच्या तीन तास आधीच फरार झाला. त्याने एक मशीन व अन्य काही साहित्य सोबत नेत पोबारा केला. मुख्य आरोपीचा शोध स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांची चमू घेत आहे. तसेच शहर ठाणेदार संतोष ताले हे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवार शोध घेत आहे. मुख्य आरोपी सापडल्यानंतर या बनावट नोट प्रकरणात प्रकाश पडेल. सहा महिन्यापूर्वी एका मध्यस्थामार्फत दोन खोल्या किरायाने घेण्यात आल्या होत्या. तसा करारनामा करण्यात आला. त्यावेळी दिलेली कागदपत्रे तपासण्यात येत आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This