How to Become a Digital Journalist
Home » एजुकेशन » भारत टॅलेंट सर्च परीक्षेत भिवापूर शाळेचे उज्वल यश.

भारत टॅलेंट सर्च परीक्षेत भिवापूर शाळेचे उज्वल यश.

वर्धा (सचिन ओली ): राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार जीवनाभिमुख शिक्षण देणारे पहिले पाऊल एज्यूमिट अकॅडमी महाराष्ट्र द्वारा आयोजित भारत टॅलेंट सर्च (बी टी एस) परीक्षा 2025 घेण्यात आली या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भिवापूर पंचायत समिती वर्धा या शाळेतील वर्ग दुसरीची विद्यार्थिनी कुमारी निधी विनोद पाल हिने जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला
तसेच वर्ग चौथीची विद्यार्थिनी कुमारी अनु अतुल शेंडे हिने प्राविण्य प्राप्त केले याबद्दल संस्थेच्या वतीने व शाळेच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांनी मिळविलेल्या यशासाठी त्यांनी त्यांच्या वर्गशिक्षिका, मार्गदर्शिका सौ रंजना गजानन लामसे मॅडम यांचे आभार व्यक्त केले तर शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र खेडकर सहाय्यक शिक्षक चंद्रशेखर लाजुरकर सहाय्यक शिक्षिका विश्रांती मस्के मॅडम यांनी त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गावातून व परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This