– मीरापूर येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश
– माजी आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश
वर्धा :
– माजी मंत्री व देवळी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रणजित दादा कांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मीरापूर येथील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय. तळेगाव टालाटुले जिल्हा परिषद सर्कलचे राहुल सुरकार, बाबाराव निवल यांच्या मार्गदर्शनात हा प्रवेश सोहळा पार पडला. माजी आमदार रणजितदादा कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विराज शिंदे, ओबीसी सेलचे जिल्हा महासचिव निलेश तिजारे, सुनील सातपुते प्रमोद वरघट यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
महेश महल्ले, अमित जुमडे, विलास आडे, राजेश सहारे, निलेश खडसे, भोला शेंडे, शकील शेख, वैभव खडसे,चेतन मीरापूरकर,सौरव कराळे, प्रतीक सहारे यांनी प्रवेश केलाय. यावेळी अमित जुमडे यांची युवक काँग्रेसच्या मीरापूर येथील अध्यक्षपदी, विलास आडे यांची सचिव, राजेश सहारे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार रणजितदादा कांबळे, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विराज शिंदे, ओबीसी सेलचे जिल्हा महासचिव निलेश तिजारे, राहुल सुरकार, बाबाराव निवल यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या
–
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940