How to Become a Digital Journalist
Home » राजनीति » युवा सेना वर्धा लोकसभा प्रमुख पदावर निखिल सातपुते यांची नियुक्ती जाहीर.

युवा सेना वर्धा लोकसभा प्रमुख पदावर निखिल सातपुते यांची नियुक्ती जाहीर.

जिल्हा प्रतिनिधी/शिवसेना ( शिंदे गट ) तर्फे वर्धा जिल्हा युवा सेना लोकसभा प्रमुख पदावर श्री निखिल सातपुते यांची नियुक्ती मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात मा श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात मा आमदार कृपाल जी तुमाने साहेब यांच्या हस्ते पूर्व विदर्भ प्रमुख मा किरण पांडव व युवा सेना कार्याध्यक्ष मा पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशाने नियुक्ती जाहीर केली.
युवा सेनेच्या माध्यमातून वर्धा जिल्हात तरुणांना संघटनेशी जोडून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा,धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरनेने संघटनात्मक बांधणी करण्याचे आदेश युवा सेना सचिव मा. शुभम नवले यांच्या नेतृत्वात केले जाईल असे यावेळी निखिल सातपुते यांनी संबोधीत केले.
या नियुक्ती करिता शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश सराफ, गणेश इखार जिल्हा संघटक संदीप इंगळे,युवा सेना जिल्हा प्रमुख मंगेश रावेकर, महेश मुडे उपजिल्हा प्रमुख रवि धोटे, सूरज पिठेकर,मंगेश भोंगाडे,अशोक भिवगडे,लोभेश बोन्डे,मयूर ढाकरे यांनी अभिनंदन केले.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This