वर्धा (सचिन ओली ): महाराष्ट्राच्या राजकारणात आम आदमी पक्षाचा धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. आप पक्षाने वर्धा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी तृतीयपंथी उमेदवार म्हणुन दत्ता नानाजी भोंबे यांना उमेदवारी दिली आहे.
हा निर्णय केवळ वर्धेसाठीच नव्हे, तर राज्यातील तृतीय पंथी समाजाच्या राजकीय समावेशनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
दत्ता भोंबे या वर्धा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 11 ब मधून नगरसेवक म्हणून निवडणूक लढवणार आहेत. आम आदमी पक्ष्याने ‘जनतेच्या सेवेसाठी आणि हितासाठी’ या उद्देशाने त्यांनी ही उमेदवारी दिली आहे. यातून आम आदमी पार्टीने समाजात दुर्लक्षित असलेल्या ‘आम ‘ घटकांना राजकीय प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.
दत्ता भोंबे यांची पार्श्वभूमी –
दत्ता भोंबे हे केवळ राजकीय उमेदवार नसून, त्यांचा लावणी या नृत्य कलेच्या बाबतीत अनेक राज्य स्तरीय व देश पातळीचे पुरस्कार व पारितोषिक पटकावले आहे, कला क्षेत्रात त्यांची उत्तम कामगिरी असुन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेल्या २५ वर्धा पासुन सक्रिय सहभाग आहे. विशेष म्हणजे दत्ता भोंबे सातत्याने मानवाधिकार साठी आणि मानवी हक्कांसाठी लढत आहेत. अनेक राजकीय पक्ष नेहमीच दुर्लक्ष करत असलेल्या ‘आम ‘ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारनाच्या मुख्य प्रवाहात येऊन ही निवडणूक लढत असल्याचे विचारवत्यानी व्यक्त करत आप पक्ष आणि आपचे वर्धा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे उमेदवारी दिल्या बद्दल आभार व्यक्त केले
आम आदमी पक्ष्याने दत्ता भोंबे यांना उमेदवारी देऊन केवळ तृतीयपंथी व्यक्तीला संधी दिली नाही, तर समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी पक्ष कार्यरत असल्याचे दाखवून दिले आहे.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940