????पोलीस अधीक्षकानी याकडे लक्ष देणे गरजेचे.
????गृहराज्य मंत्र्याच्या मतदार संघातील पोलीस स्टेशन कडे कोण लक्ष देणार.
वर्धा : गृहराज्यमंत्री तथा वर्धेया चे पालकमंत्री यांच्या च विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या पोलीस ठाणे रामनगर ज्या वास्तू मध्ये आहे त्या वास्तू मध्ये सद्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पावसाच्या पाण्या मुळे हाल होत असल्याचे दिसून येत आहे ठाण्यामध्ये सर्वत्र पाण्याने थैमान घातलेला आहे. सर्वं खोल्या मध्ये पाणी गळत आहे. त्या मुळे पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय कामं करताना अडथळा निर्माण होताना दिसत आहे .कारण पूर्ण ठाणे हे जुन्या पद्धतीने बांधले असल्याने तेथील खोल्यानं मध्ये पाणी झिरपत असल्याचे दिसून आले
पाण्याच्या झिरपण्यामुळे कोणत्या ही प्रकारचे महत्वाची कागद पत्रे किंवा संगणक खराब होऊन मोठया प्रमाणात शासकीय दास्तावेज खराब होऊ शकतात. किंवा पाण्याच्या झिरपण्याने कोणत्या प्रकारच्या विदयुत प्रवाहा मुळे अन्वनी घटना होऊ शकते. व ठाण्या मध्ये पाणी साचल्याने डास होऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो ही पालकमंत्री महोदय, पोलीस अधीक्षक किंवा ठाणेदार साहेबांनी बांधकाम विभाग किंवा नगर परिषद विभागशी चर्चा करून या बाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी पोलीस कर्मचाऱ्यांची आपल्या ठाण्या विषय मौखिक मागणी असल्याचे दिसून आले. तरी या कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940