How to Become a Digital Journalist
Home » अपराध » वर्धा लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाची सेलू भूमी अभिलेख कार्यालयातील भु कर मापकावर कारवाई!

वर्धा लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाची सेलू भूमी अभिलेख कार्यालयातील भु कर मापकावर कारवाई!

भू कर मापक नरेश चंद्रकांत जाधव याला केली अटक.

पाच हजार रुपयाची स्वीकारत होता लाच.


वर्धा :-राष्ट्रीय महामार्गात संपादीत केलेल्या जमिनाची मोजणी संदर्भातील सूयुक्त अहवाल देण्यासाठी सेलू येथील भूमापरक नरेश जाधव याने शेतकऱ्याला सहा हजाराची लाच मागितली , लाचेच्या रकमेपैकी पाच हजार स्वीकारतांना लाचलूचपत विभागाणे रांगेहाथ पकडले.
घटनेची थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की,तक्रारदार यांचे आईचे नावाने असलेली शेतजमीन मौजा दोराली सर्वे नंबर 33 त. सेलू जिल्हा वर्धा ही सन 2020- 21 मध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी संपादित केली असून त्या जमिनीतील विहिरीच्या जागेचा मोबदला मिळाला नसल्याने त्याबाबत उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग यांचे कार्यालयकडून पंचनामा करून त्याचा संयुक्त मोजणी अहवाल उप विभागीय अधिकारी वर्धा यांना पाठविण्यासाठी आरोपी भु कर मापक नरेश जाधव यांनी आज दि 20/1/2025 रोजी रुपये 6000/-मागणी करून पडताळणी दरम्यान 5000/- मागितल्याचे निष्पन्न झाले व पंचासमक्ष रुपये 5000/- स्वीकारल्याने आरोपी नरेश जाधव यास ताब्यात घेण्यात आले असून पोलिस स्टेशन सेलू जिल्हा वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील करवाई पोलीस उपअधीक्षक वैशाली वैरागडे व त्यांची टीम करीत आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This