वर्धा जिल्ह्यातील कामगारांना MREGS च्या व्यतिरिक्त योजनेतून लाभ देण्यात आला का?
बाकी योजनेचे काम MREGS च्याच मोबदल्यात तर केले नाही?
वर्धा जिल्हा प्रतिनिधी /
वर्धा वनपरिक्षेत्रामधील कर्तव्यदक्ष अधिकारी रुपेश खेडकर साहेब हे गेल्या 5 वर्षा असून आपली सेवा देत आहे. खेडकर साहेब वर्धा जिल्ह्यातील स्थानिक असून सुद्धा एकाच वनपरीक्षेत्रामध्ये त्यांची सेवा 3 वर्षा पेक्षा जास्त झाली आहे, सदर सेवेला 2 वर्षाचा अधिक विस्तार देण्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे हे कळायला मार्ग उरला नाही. यातून ते सेवा करीत नसून खूप मोठा मावा खात असल्याची जोरदार चर्चा वनविभागातील कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.
म्हणून ते आपली नियुक्ती हे वर्धा वनपरिक्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षापासून टिकून ठेवत तर नाही ना?
तसेच त्यांनी वर्धा वनपरिक्षेत्रामध्ये आपली सेवा देताना वर्धा वनपरिक्षेत्राच्या विविध सहवनक्षेत्रात अनेक रोपवाटिका/ रोपवने विविध योजनेतून तयार केल्या गेली आहे. पण प्रत्यक्षात त्याचे परिणाम कुठेही दिसत नाही. साहेबांचे लक्ष रोपवने रोपवाटिका तयार करण्यामध्ये एवढे व्यस्त होते की वर्धा वनपरिक्षेत्रामध्ये होत असलेल्या अवैध बाबींवर साहेब कानाडोळा करीत होते, यामध्ये पडद्यामागची भूमिका निभावून मोठे लक्ष्मी दर्शन तर झाले नाही ना? कारण अशी जोरदार चर्चा लोकांमध्ये रंगत आहे.
पण त्यात प्राधान्य स्थानिक मजुरांना दिले कि बाहेर जिल्ह्यातील मजुरांना? हे मात्र गुलदसत्यात आहे.
गेल्या काही वर्षा पासून मनरेगा या योजनेतून रोपवने व रोपवाटीका उपरोक्त अधिकाऱ्यांनी तयार केल्या, परंतु सूत्रांच्या माहिती नुसार मनरेगा च्या माध्यमातून लावले त्याच मजूरांनकडून बाकी काम त्याच मोबदल्यात करून घेतले अशी वनविभागमध्ये चर्चा रंगली आहे. असे झाले असेल तर CAMPA/ ROF / DPDC ई. योजनेतून त्यांनी कोणत्या रोप वाटीका/ रोपवने तयार केले व त्याचा लाभ कोणत्या कामगारांना मिळाला याची माहिती माहितीचा अधिकार अधिनियमाच्या माध्यमातून मिळणारच.
सद्या स्थितीत वर्धा वनपरिक्षेत्रामध्ये खेडकर साहेबांनी केलेली रोपवाटीका व रोपवने याची स्थिती काय आहे?
त्यातील झाडें किती टक्के जगले कि नाहीसे झाले हे ही पाहणे महत्वाचे आहे. किंवा प्रत्यक्षात ते लावलेच नसल्याची शकता नाकारता येत नाही.
म्हणूनच साहेबांना वर्धा जिल्हा सोडायचा तर नाही ना असा संशय सामान्य नागरिकांना तसेच वनविभागतील कर्मचाऱ्यांना पडतो आहे. पण हे ठरले साहेब जे की स्थानिक आमदार व माजी खासदार यांचे नातेवाईक आहे असे सांगत असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे, यांच्या वाटी कोण जाणार..?
काही दिवसातच वर्धा वनपरिक्षेत्रामध्ये रोपवने/रोपवाटिकाचा खेळ उघडकीस येणार हे मात्र नक्की.
क्रमशः 2
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940