How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » वर्धा शहर पोलिसांची कारवाई 13 लाख रुपयाची दारू जप्त!

वर्धा शहर पोलिसांची कारवाई 13 लाख रुपयाची दारू जप्त!

वर्धा : वर्धा शहर पोलिसांनी काल रात्री उशिरा केलेल्या एका धाडसी कारवाईत अवैध देशी आणि विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करत दोन तस्करांना रंगेहाथ अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत ब्रेझा (Brezza) वाहनासह एकूण ₹12 लाख 90 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून अवैध दारूच्या व्यवसायावर कठोर प्रहार केला आहे.
कारवाई सविस्तर
वर्धा शहर पोलीस येथील पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम लेआउट बोरगाव मेघे येथे नाकाबंदी लावण्यात आली होती.
मध्यरात्री सुमारास 00:30 ते 01:15 दरम्यान सुझुकी कंपनी च्या
काळ्या रंगाची ब्रेझा वाहन क्रमांक (MH-32-AH-3417)
वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी तसेच विदेशी दारू लपवून नेली जात असल्याचे आढळले. त्या मध्ये दोन युवकाना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन युवक आरोपींना अटक केली आहे त्या मध्ये
दिनेश अशोकराव येंडेले (35), रा. नलवाडी, वर्धा
सुशांत राजू खोबरागडे (24), रा. विक्रमशिला नगर, सिंदी मेघे, वर्धा असे असून
जप्त केलेला मुद्देमालाचे एकूण मूल्य: ₹12,90,000
या मध्ये
सुझुकी कंपनी चे ब्रेझा वाहन (तस्करीसाठी वापरलेली)अंदाजे किंमत ₹10,00,000 |
| टँगो कंपनी देशी दारू | 48 पेट्या | ₹2,16,000 |
| ऑफिसर चॉईस विदेशी दारू | 6 पेट्या | ₹54,00 |
अँड्रॉइड स्मार्ट फोन | 1 नग | ₹20,000 असा असून
पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि मोटार वाहन अधिनियमातील विविध कलमांखाली (जसे की 65(A), 65(E), 77(A), 83 तसेच 3(1), 181, 130, 177) गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
वर्धा शहर पोलिसांच्या या जलद आणि परिणामकारक कारवाईचे नागरिकांनी मनसोक्त कौतुक केले आहे. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांच्या टोळीत मोठी खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली,
पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या देखरेखीखाली PSI विशाल सवाई ,PSI सीनूकुमार बनोत आणि त्यांचे पथक पो.हवा. विजय पंचटिके, पोहवा शैलेश चाफलेकर ,पो.हवा महेंद्र पाटील ,पो.हवा नितीन ईटकरे,न.पो.शी. पवन लव्हाळे,पो.शी.शिवदास डोइफोडे पो.शी. नंदकिशोर धुर्वे ,पो.शी. रणजीत भुरसे यांनी केली.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This