How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » वाहनांमुळे पोलीस विभागाच्या कामांना गती मिळेल – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर.

वाहनांमुळे पोलीस विभागाच्या कामांना गती मिळेल – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर.

 पोलीस विभागाच्या वाहनाचे लोकार्पण.
 स्वरतरंग कार्यक्रम.

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पोलीस दलांनी गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी बजावली असून कमी वेळात गुन्हा ची तपासणी करुन गुन्हे उकल केले आहे. ही कामगिरी जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १ कोटी १७ लक्ष ८२ हजार रुपयाचा निधी मंजूर करुन ७ महिंद्रा बोलेरो जीप व २ मालवाहू टाटा टेम्पो वाहन खरेदी करण्यात आले आहे. या वाहनामुळे पोलीसांना गुन्ह्याच्या ठिकाणी लवकर पोहोचण्यास मदत होईल. तसेच पोलीस विभागाच्या कामांना गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण,गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मराठी हास्य धमाल व कैलास खेर यांच्या हिंदी गितांच्या स्वर तरंग कार्यक्रमात केले
पोलीस विभागाच्यावतीने पोलीस कल्याण निधी करीता स्वर तरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी या स्वरतरंग कार्यक्रमाचे आयोजण केल्याबाबत न्युरॉन हास्पीटल नागपूर, इवोनिथ स्टील भुगांव , सीडेक एक्सप्लोजीव्ह तळेगाव, दत्ता मेघे अभिमत विद्यापिठ सावंगी , अग्नीहोत्री ग्रुप,महालक्ष्मी संगम स्टील देवळी यांचे आभार मानले.
पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कुटूंबाना वेळप्रसंगी आर्थिक मदतीची आवश्यकता पडते अशा वेळी पोलीस कल्याण निधीमधून मदत करण्यात येते या निधी मध्ये वाढ करण्यासाठी अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

या कार्यक्रमामुळे वर्धा पोलीस कल्याणनिधीत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे दिलीप भुजबळ म्हणाले.
स्वरतरंग कार्यक्रमात मराठी हास्य कलाकार भारत गणेशपुरे, सागर कारंडे, मेघना येरंडे, माया शिंदे, हेमांगी कवी, गौरव मोरे, जयवंत भालेराव आदी कलाकरांनी कला सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली तसेच कैलाश खेर यांनी गायिलेल्या गान्यांना प्रक्षेकांनी दाद दिली.
यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते कैलाश खेर व हास्य मराठी धमाल कार्यक्रमातील कलाकारांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This