वर्धा (सचिन ओली) : नगर परिषद ची तारीख जाहिर झाल्या नंतर राजकीय पक्ष, स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवारांनी तयारी जोरात सुरू केली आहे. कोणत्या प्रभागात कोणत्या गटासाठी जागा आरक्षित झाली आहे, यानुसार पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात संपर्क मोहीम, जनसंपर्क बैठक, सामाजिक कार्यक्रमांमधील उपस्थिती वाढविणे अशा उपक्रमांना प्रारंभ केला आहे.

स्थानिक नेतृत्वासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. दरम्यान, नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष उमेदवाराची
ताळमेळ जुळवत आहे. कि कोण उमेदवार असेल अश्यातच शिवसेना शिंदे गटने आपला 
नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पक्का केला आहे. ते म्हणजे वर्ध्यातील शिवसेना मधला चर्चीत प्रमाणिक व सुसंस्कृत चेहरा म्हणजे रविकांत बालपांडे अशी माहिती विश्वसनीय सुत्रांच्या कडून मिळाली आहे. आत्ता नगर परिषद चा नगराध्यक्ष कोण होणार कारण शिवसेना शिंदे गट ने रविकांत बालपांडे यांची उमेदवारी पक्की केली आहे. याचा अर्थ म्हणजे युती होणार नाही यातच आघाडी ने सोबत निवडणूक लडण्याचे ठरवले आहे तरी बालपांडे विरुद्ध अंदाजे पांगुळ ही निवडणूक रंगणार अशी चर्चा सध्या वर्धा शहरात सुरु आहे.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940