वर्धा(सचिन ओली ) :नगर परिषद ची तारीख जाहिर झाल्या नंतर राजकीय पक्ष, स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवारांनी तयारी जोरात सुरू केली आहे. कोणत्या प्रभागात कोणत्या गटासाठी जागा आरक्षित झाली आहे, यानुसार पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रभागात संपर्क मोहीम, जनसंपर्क बैठक, सामाजिक कार्यक्रमांमधील उपस्थिती वाढविणे अशा उपक्रमांना प्रारंभ केला आहे.
स्थानिक नेतृत्वासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. दरम्यान, नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष उमेदवाराची 
ताळमेळ जुळवत आहे. कि कोण उमेदवार असेल अश्यातच शिवसेना शिंदे गटा ने आपला
नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पक्का केलेला आहे . ते म्हणजे वर्ध्यातील शिवसेने मधला चर्चीत प्रमाणिक व सुसंस्कृत चेहरा म्हणजे रविकांत बालपांडे अशी माहिती विश्वसनीय सुत्रांच्या आधारे मिळाली आहे. आत्ता नगर परिषद चा नगराध्यक्ष कोण होणार कारण शिवसेना शिंदे गटा ने रविकांत बालपांडे यांची उमेदवारी पक्की केली आहे. याचा अर्थ म्हणजे भाजप सेना राष्ट्रवादी मध्ये युती होणार नाही यातच आघाडी ने सोबत निवडणूक लडण्याचे ठरवले आहे अशी माहिती आहे तरी बालपांडे विरुद्ध पांगुळ विरुद्ध ठाकूर किंवा भाजप चा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अशी लढत रंगणार असल्याची चर्चा सध्या वर्धा शहरात सुरु आहे.
कर्मश:
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940