????सामाजिक बांधिलकी जोपासत राबविला समाजहितार्थ उपक्रम.
????गरजू गरिबांना आवश्यक साहित्य मिळालेले चेहऱ्यावर फुलला आनंद.
वर्धा:- 30 टक्के राजकारण तर 70 टक्के समाजकारण या मूळ हेतूला साध्य होईल असा उपक्रम वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान 300 हून अधिक गरजू आणि गरिबांना आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले. आवश्यक साहित्य मिळाल्यावर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या हितार्थ मोठा निर्णय घेत भाजपाशी सोयरीक जोडली. परंतु सदर घटनेनंतर त्यांच्यावर अनेक आरोप झाले. अशाही परिस्थितीत त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या निकटवर्ती यांना आपले मनोधैर्य खचू देऊ नका असा धीर दिला. इतकेच नव्हे तर अनेकांचे समस्या व्यक्तिगतरीत्या जाणून घेतल्या. शिवाय त्या तातडीने कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्न केले. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यात विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात नामांतर गरजू येथील असा कयास काही राजकीय पुढारी व्यक्त करत होते. पण प्रत्यक्षात या उपक्रमाला गरजू आणि गरिबांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला. उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची विशेष विचारपूस करण्यात आली. त्यांची गरज काय याची माहिती घेऊन त्यांना आवश्यक साहित्य पुरवण्यात आले. राजकीय पुढारी केवळ राजकारण करतात पण कामावर प्रेम करणारे एकनाथ शिंदे साहेब खऱ्या अर्थाने आमची समस्या मार्गी लावण्यासाठी रात्र दिवस झटतात अशीच प्रतिक्रिया या उपक्रमात उपस्थित होऊन आवश्यक साहित्य मिळालेल्यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा प्रमुख शिवसेना (शिंदे गट )गणेश ईखार तसेच वर्धा जिल्हाप्रमुख महिला आघाडी शुभांगी ठमेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, व शिवसेनिक महिला आघाडी पदाधिकारी आणि असंख्य महिला तसेच कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक यांनी सहकार्य केले.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940