पी.एम. किसान सन्मान निधी वितरण समारंभ
पंतप्रधान यांच्या हस्ते किसान सम्मान निधीचा १९ वा हप्ता वितरण थेट प्रक्षेपण.
वर्धा : शेतक-यांनी शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेऊन स्वत:चे वर्षभर मिळेल असे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे. यासाठी नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक शेती कडे वळावे, असे मनोगत खा. अमर काळे यांनी पी.एम.किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्प्त्याचे वितरण समारंभ प्रसंगी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीच्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथे करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पी.एम. किंसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. राजेश बकाने, वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जीवन कतोरे, डॉ. रुपेश झाडोदे, डॉ. निलेश वझिरे, डॉ. सचिन मुळे, डॉ. सविता पवार, मंडळ कृषि अधिकारी सुभाष मुडे, तालुका कृषि अधिकारी निलेश उगवेकर, निकेश इंगोले, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री जांगळेकर, बायफ चे संजय बाभूळकर आदी उपस्थित होते.
कृषि विज्ञान केंद्रानी शेतक-यांना मार्गदर्शन करुन शेती पुरक उद्योग विकासासाठी प्रेरीत करावे. असेही खा. अमर काळे पुढे बोलताना म्हणाले.
शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने शास्त्रीय पद्धतीने शेती करावी तसेच मूल्यवर्धन प्रक्रिया करून बाजारपेठ संधीचा लाभ घ्यावा व उत्पन्न वाढवावे. कृषी विज्ञान केंद्राने बिजोत्पादन वाढून ते बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. तसेच हाय-टेक नर्सरी उभारावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतावर उत्तम दर्जाची रोपे जातील. यासाठी लक्ष केंद्रीत करावे. बचत गटांचे उत्पादन विक्रीसाठी एक भवन देवळी येथे उभे करण्यात येईल असे राजेश बकाने म्हणाले
डॉ जीवन कतोरे यांनी पी एम किसान सम्मान निधी योजने विषयी विस्तृत माहिती तसेच कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प याविषयी माहिती दिली.
तांत्रिक सत्रा दरम्यान डॉ रुपेश झाडोदे यांनी उन्हाळी पीक लागवड विषयी तर डॉ निलेश वझीरे यांनी उन्हाळी पिकातील कीड व रोग नियंत्रण व डॉ सचिन मुळे यांनी दुग्धव्यवसाय व जनावरांची काळजी तसेच डॉ सविता पवार यांनी ड्रोन फवारणी तंत्रज्ञान व बीबीएफ तंत्रज्ञान या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी पी एम किसान सम्मान निधीच्या लाभार्थ्या सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत 26 दिवसीय मशरूम उत्पादन प्रशिक्षण उत्तम रित्या पूर्ण करणाऱ्या विनोद दांदळे, प्रवीण येनूरकर, इरफान अली, विजय सिडाम, वैशाली दिघीकर, नीलिमा अक्कलवार या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कृषि विज्ञान केंद्र येथे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, देवळी, वर्धा, महाबीज, प्रगतिशील शेतकरी यांची दलाने उभारण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ अंकिता अंगाईतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ प्रेरणा धुमाळ, गजानन म्हसाळ, वैशाली सावके, समीर डेकाटे, किशोर सोळंके, प्रतीक्षा पिंपळे, समीर शेख, दिनेश चराटे, माधुरी डफाडे, वसीम खान, गजेंद्र मानकर, प्रबोध पाटे, सुमित म्हसाळ, वैभव चौधरी, ऋतुजा कोरडे व सर्व चमू यांनी योगदान दिले.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940