How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्या वर शासकीय निवास्थानाचे लाखो रुपये थकीत!

सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्या वर शासकीय निवास्थानाचे लाखो रुपये थकीत!

वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभाग येथे कार्यकारी अभियंता म्हणून सतीश अंभोरे यांनी सेवा दिली आहे. असे असताना अंभोरे यांनी नागपूर येथील शासकीय निवासस्थान हे सोडले नसल्याने त्याच्यावर किराया थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात नागपूर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर यांनी वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवल्याची सूत्राद्वारे माहिती आहे.पत्रामध्ये संबंधित विषयाचा उल्लेख असून सतीश अंभोरे वर 45 लक्ष 66 हजार 6 रुपयाचा किराया थकीत असल्याचा उल्लेख आहे. या मध्ये अंभोरे यांच्या देयक वेतनातून किरायाची थकबाकी वसूल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.
अंभोरे यांनचा कार्यकाळ नेहमी वादगस्त राहला आहे. पण सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा अंभोरे वादाच्या भोऱ्यात आले आहे. पत्रानुसार सतीश अंभोरे 1एप्रिल 2017 पासून नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरात देशपांडे सभागृह जवळ अजिंठा या आलिशान शासकीय निवासस्थानावर राहत आहे .
3 जुलै 2023 ला त्यांनी वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारला काही काळ झाल्यावर पण अंभोरे यांनी नागपूर येथील शासकीय निवासस्थान सोडले नाही त्यामुळे नागपूर येथील कार्यकारी अभियंता यांनी वर्धा सार्वजनिक बांधकाम यांना पत्रद्वारे निवासस्थान सोडण्याचे आदेश दिले आहे तरी शासकीय निवास खाली न केल्याने नागपूर कार्यकारी अभियंता ने शासकीय निवासस्थानाचे किरायाची वसुली संबंधित पत्र कार्यालयाला पाठवले आहे.
तरी पण एप्रिल ते जून 2023 व जुलै 2023 चे आतापर्यंतचे किराया बाकी असल्याने वसुलीचे कोणतेही पत्र किंवा नोटीस कार्यालयाला प्राप्त झाले नाही. अंभोरे हे नोव्हेंबर महिन्यात वर्धा येथून सेवानिवृत्त झाले आहे असे असताना अंभोरे यांच्या निवृत्तीवेतन मधून कशाप्रकारे शासकीय निवासस्थानाचा किराय वसूल केला जाईल अशी माहिती संबंधी अधिकाऱ्याला सूचना दिल्याचे पत्रामध्ये आहे. 45लाख 66हजार 6 रुपये दंड आकारलेला रक्कम आहे. व अधिक विलंब लागल्यास त्याच्यावर व्याज लावाण्यात येईल अशी निर्देश दिले आहे असे असताना सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे पुन्हा चर्चेत आल्याचे दिसून येते यावर वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This