समुद्रपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत गिरड सहवनक्षेत्रात आज बुधवार, दिनांक 22/01/2025 रोजी समुद्रपूर-गिरड महामार्गावर धोंडगांव जवळ पहाटेचे सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत वय अंदाजे चार महिने असलेल्या वाघिणीच्या शावकाचा (मादी) मृत्यु झाला.
सदर मृत्यु झालेल्या वाघ शावकाचे गिरड येथील वन निरीक्षण कुटी येथे NTCA (राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण) च्या मार्गदर्शक SOP (प्रमाणित कार्यपध्दती) नुसार शवविच्छेदन केले व अग्नी देवून दहन करण्यात आले. यावेळी श्री हरवीर सिंह उपवनसंरक्षक, वर्धा, श्री अमरजित पवार, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु व वन्यजीव), वर्धा, NTCA प्रतिनिधी श्री बंडू धोत्रे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्री अरूण तुराले, डॉ. श्री योगेश राघोर्ते, डॉ. कल्याणी लोथे, डॉ. ज्योती चव्हाण, मानद वन्यजीव रक्षक श्री कौशल मिश्रा, श्री संजय इंगळे तिगांवकर, PFA चे श्री कौस्तुभ गावंडे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री रुपेश खेडकर, क्षेत्र सहाय्यक श्री राजु धनविज, श्री प्रभाकर नेहारे, वनरक्षक श्री पांडुरंग बेले, समीर वाघ, लोमेश गोहाणे इत्यादी उपस्थित होते.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3261
Total views : 4945