How to Become a Digital Journalist
Home » ताजा खबर » कस्तुरबा हेल्थ सोसायटी विरोधात कर्मचाऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू. मागण्या मंजूर न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार- इंजि.तुषार उमाळे

कस्तुरबा हेल्थ सोसायटी विरोधात कर्मचाऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू. मागण्या मंजूर न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार- इंजि.तुषार उमाळे

‘कस्तुरबा हेल्थ सोसायटी’ अंतर्गत येत असलेल्या ‘कस्तुरबा रुग्णालय ‘ व ‘महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था’ येथील कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
कर्मचाऱ्यांनी कस्तुरबा संस्थेच्या प्रशासनाला वारंवार दाद मागूनही त्यांना न्याय मिळाला नाही.शेवटी कर्मचाऱ्यांच्या नाय मागण्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकाव्या याकरिता संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक तुषार उमाळे यांच्या नेतृत्वाखाली ‘कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटना’ नोंदणी क्रमांक ५८१८बही कायदेशीर कामगार संघटना स्थापन केली.
परंतु संघटना स्थापन केल्याबरोबर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार संघटनेच्या सदस्यांचा मानसिक छळ सुरू केला.मात्र तरीही संघटनेचे पदाधिकारी ठाम राहिले.
सण २०२३ पासून संस्थेमध्ये नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेने अनेकदा संस्थेच्या व्यवस्थापनाला शेकडो कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे अनेक निवेदने दिली.मात्र कस्तुरबा हेल्थ संस्थेच्या प्रशासनाने त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
दि.१० डिसेंबर २०२४ रोजी पुन्हा एकदा कामगार संघटनेतर्फे कस्तुरबा संस्थेच्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी स्मरणपत्र देऊन शेवटची विनंती व निर्वाणीचा इशाराही दिला. मात्र त्यालाही संस्थेने प्रतिसाद दिला नाही.
म्हणून कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने संविधानाच्या कलम १९ (१)(क) नुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपल्या न्याय मागण्यांसाठी आज सकाळी ९वा.पासून कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटनेचे अध्यक्ष तुषार उमाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार घरभाडे भत्ता लागू करावा,
सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी कपात करण्यात यावी,भेदभाव न करता इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रायव्हेट रूमची सुविधा देण्यात यावी,
पूर्वी 12 व 24 वर्षांच्या सेवेनंतर मिळणारे लाभांच्या बदली सातवे वेतन आयोगानुसार 01/01/2016 पासून सुधारित सेवांतर्गत 10, 20, 30वर्षे सेवा कालावधीची आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावा,
संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर त्या निवृत्त कर्मचाऱ्याला संस्थेने विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ द्यावा,
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सात दिवस रात्रपाळीची ड्युटी झाल्यानंतर त्यांना नाईट ऑफ व साप्ताहिक सुट्टी मिळायला पाहिजे,
भविष्यात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वेळ व सन्मानजनक वागणूक द्यावी,
एखाद कर्मचारी कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटनेचा सदस्य असल्यास त्याच्यावर दबाब टाकू नये व त्याचा मानसिक छळ करू नये,
कस्तुरबा हेल्थ सोसायटी नियमित कामगार संघटनेला संस्थेच्या परिसरात योग्य कार्यालय उपलब्ध करून घ्यावे.
इत्यादी मागण्यांसाठी शेकडो कर्मचाऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात जनतेला निर्भय होण्याचा व आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन अहिंसेच्या मार्गाने लढण्याचा संदेश दिला आणि आज गांघीजींच्या नावाने व विचारांनी चालत असलेल्या संस्थेत कर्मचाऱ्यांनी संघटित होण्याला संस्थेच्या प्रशासकांचा होत असलेला विरोध हा गांधी विचारांच्या विरोधी आहे.
कस्तुरबा संस्थेमधील कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरविणारे कर्मचारी असून हजारो गोरगरीब रुग्णांना आपल्या सेवेतून जीवनदान देत असतात आज त्याच कर्मचाऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही संस्थेसाठी चांगली गोष्ट नाही.
या आंदोलनाला नानाजी चावरे,सुनील कोल्हे,ऍड. कपिलवृक्ष गोडघाटे, नरेंद्र पहाडे, माजी पोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश काकडे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला व काकडे हे मनोगत व्यक्त करताना बोलले की “गांघींच्या संस्थेत कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून न्याय मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांवर रस्त्यावर उतरण्याची पाळी येत असेल तर ही संस्थेच्या व्यवस्थापकांसाठी शरमेची गोष्ट आहे.
तसेच याबाबत ते उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांना भेटून संस्थेवर योग्य कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
या आंदोलनामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावून आळीपाळीने सहभाग घेतला आहे व कर्तव्यावर असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून या आंदोलनाला पाठींबा दिला.
संस्थेने कर्मचाऱ्यांवर कुठलीही दडपशाही करू नये व कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर कराव्या.मात्र असे न केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा तुषार उमाळे यांनी दिला आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This