How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » महिलेच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिद्वारे 3 किलोचा काढला मासाचा गोळा.

महिलेच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिद्वारे 3 किलोचा काढला मासाचा गोळा.

सामान्य रुग्णालयात स्त्रीरोग विभागात अवघड शस्त्रक्रिय यशस्वी.

महिलेला मिळाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ.

वर्धा : वर्धा तालुक्यातील आलोडी येथील विद्या विनोद मेहर ही महिला पोटाच्या आजाराने गेल्या तीन वर्षापासुन ग्रस्त होती. तिला सामान्य रुग्णालयातील स्त्रीभागात दाखल केल्यावर स्त्रीरोग तज्ञ डॉ. मनिषा नासरे यांनी तपासणी करुन आवश्यक तपासण्या केल्या असता महिलेल्या पोटात तीन किलोचा मासाचा गोळा असल्याचे निदर्शनास आले. डॉ. मनिषा नासरे यांनी तात्काळ निर्णय घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या मार्गदर्शनात महिला रुग्णावर अवघड अशी 3 ते 4 तासाची शस्त्रक्रिया करुन रुग्णाच्या पोटातील गर्भाशयातून तीन किलोचा मासाचा गोळा काढून दुखण्यांच्या आजारापासुन सुटका करण्यात आली.
सदर शस्त्रक्रिया ही महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोगय योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर करण्यात आली. योजनेंतर्गत सर्व घटकातील रुग्णांना 5 लाख रुपयापर्यंत ग्रामीण व शहरी भागातील कुटूंबांना लाभ देण्यात येतो.
सदर शस्त्रक्रिया डॉ. सुमंत वाघ व योजनेचे अधिकारी डॉ. प्रविण धाकटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. मनिषा नासरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रियंका तळवेकर यांनी पार पाडली यासाठी भुलतज्ञ डॉ. अर्चना झोडे, डॉ. प्राची, डॉ. सृष्टी रायजादा यांनी सहकार्य केले तर संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी दुर्गा हटवार, लीना भगत, विनोद पंधरे, तेजस पाचगे तसेच योजनेचे कर्मचारी सुकेशनी शेंदरे, मोनिका उघडे, सारंग भुंबरे इत्यादीनी सहकार्य केले.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This