How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » तीर्थक्षेत्र मालकोजी देवस्थानाच्या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे.

तीर्थक्षेत्र मालकोजी देवस्थानाच्या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे.

वर्धा (सचिन ओली ):- गोजी येथील मालकोजी देवस्थान येथे पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत रस्त्याचे बांधकाम सुरु आहे सदर रस्त्याच्या रुंदीकरण करण्यासाठी चक्क माती मिश्रित मुरूम टाकून जिल्हा परिषद बांधकाम विभागाची दिशाभूल केली जात आहे .

वर्धा उपविभागाचे शाखा अभियंता यांनी मोक्का पाहणी केल्यानंतर सुद्धा त्यांच्या उघड्या डोळ्यांनी माती मिश्रित मुरूम दिसलें नाही, हि बांधकाम उपविभागाची शोकांतिका आहे. असे असताना शाखा अभियंता यांनी गांधारीचे रूप धारण केल्याचे दिसून येत आहे. यावरून बांधकाम विभागाची तत्परता दिसून येते. कंत्रादारसोबत उपविभागाची साथ भेट तर नाही अशी चर्चा गावात जोर धरीत आहे. मुख्य अभियंता महोदय यांनी या प्रकारनाकडे लक्ष देऊन सदर कंत्राटदार यावर कारवाई करावि अशी मागणी जोर धरित आहे. माती मिश्रित मुरूम वाहतुकीबाबत संबंधित ठेकेदार यांच्या कडे कुठंलिही परवानगी आहे कि नाही ? हा रस्ता सय्यद नामक कंत्राटदार कडे असून त्याने रस्त्या चे कामं निकृष्ट दर्जा चे केलेले दिसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तरी या रस्त्याचे बांधकाम लवकर करून नागरिकांना दर्शना करिता जाण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी..

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This