सुरु असलेल्या वाळू चोरीवर शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेध…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिष्टमंडळाने काळी पट्टी बांधून आंदोलनं करीत तहसीलदार यांना दिले निवेदन…

वर्धा : हिंगणघाट व समुद्रपूर तालूक्यातील वाळू डेपोच्या आडून सर्रास २४ तास वाळू उपसा केला जात आहे. मागील दोन वर्षापासून हा प्रकार सर्रास सुरु असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे. आता सुद्धा अश्याच प्रकारची वाळू तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात वाळू पुरविण्याचा शासनाचा हेतू हे असले वाळू माफिया पायदळी तुडवीत आहे.
वाळू डेपो आडून कुठल्याही प्रकारची वाळू चोरी आम्ही खपऊन घेणार नाही. कारण शासन वाळू तस्करीवर आळा लावण्यात असमर्थ ठरत आहे. अवैध्य वाळू माफियावर कारवाई झाली नाही तर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी- (श.प) रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणत आंदोलन करेल. या आंदोलना नंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिष्टमंडळा द्वारे देण्यात आले.
हिंगणघाट व समुद्रपूर येथील राजकीय वलय असणारे नेते व पुढारी यांचे वाळूचे मोठया प्रमाणात वाळू उपसा चे काम करतात अशी सूत्राद्वारे माहिती आहे.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3271
Total views : 4973