वर्धा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुरोगामी विचारवंत, शिवाजी कोण होता या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक काॅ डॉ गोविंद पानसरे हे पत्नी सह माॅर्निंग वाॅक ला सकाळी फिरत असतांना सनातनी वृत्तीच्या तरूणांनी पती पत्नी वर 16 फेब्रुवारी 2014 रोजी गोळ्या घालून ठार करण्याचा प्रयत्न केला ज्यात उपचारा दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी काॅ डॉ गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या नंतर त्यांना अपंगत्व आले त्याला दहा वर्षे झाले मात्र अजूनही मारेकरी त्यांच्या मागे मास्टरमाईंड असलेली संघटना, व्यक्ती यांना सजा झाली नाही उलट या हत्या प्रकरणात सहभाग असलेले ज्यांना महत प्रयत्नाने पोलिसांनी पकडले ते वासुदेव सुर्यवंशी,अमित डेगवेकर, गणेश मिस्किन सचिन अंदुरे भरत कुरणे,अमित बड्डी यांना सरकारी वकिलांच्या जोरदार विरोधाला न जुमानता जामिन दिला असे हत्यारे न्यायालयाच्या आदेशानुसार समाजात उथळ माथ्याने फिरत असून समाजातील काॅ डॉ गोविंद पानसरे सारख्या अनेक विचारवंत, कार्यकर्ते यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे याला विरोध व निषेध व्यक्त करण्यासाठी आज म.गांधी पुतळ्याजवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कॅम्यूनिष्ट पक्ष,आयटक सिटू,च्या विविध विंगचे कार्यकर्ते पदाधिकारी व वर्धा जिल्हा पुरोगामी संस्था संघटना समन्वय समितीचे विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून वरील सहाही आरोपींचा जामिन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे पानसरे याच्या हस्तेमागिल मास्टरमाईंड व्यक्ती संस्था संघटना यांचा छडा लावून या सर्वांना फासावर लटकवावे व अशा प्रवृत्तींच्या संस्था संघटना व्यक्ती यावर बंदी घालून लवकरात लवकर या केसचा निकाल लावून आरोपींना कठोरात कठोर सजा द्यावी या मागणीचे निवेदन मा मुख्यमंत्री मा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा निवासी उपजिल्हाधिकारी यांना सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले
यावेळी संयुक्त कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुणवंत डकरे,आयटकचे जिल्हाध्यक्ष मनोहर पचारे, महिला फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षा व्दारकाताई ईमडवार, सचिव अर्चना उटाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोतराव ईमडवार,संबुंध्द महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शारदाताई झामरे, जिल्हा काॅग्रेस पक्षाच्या इंटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड नंदकुमार वानखेडे, महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अलका वानखेडे, शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक नन्नोरे , जिल्हा काॅग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रविण पेठे,सिटूचे सुनील घिमे,संजय भगत,यासह शिला ढोबळे,अक्रम पठाण अशोक चौधरी, संदिप चौदरी मैना उईके दामिनी कुमरे,चंदा तामताडगे, प्रणिता मोहनकर,ज्योती कामडे भारती धाबेकर, संगिता कुरसंगे भिमा लेन्डे, सुनिता धोंगडे शितल शोक्कलवार रजनी सुरकार सुशिला हरडे आदी विविध संस्था संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940