वर्धा :- वृक्ष ही काळाची गरज आहे परंतु विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्ष तोडल्या जात आहे तर शासनस्तरावर वृक्ष लागवड योजना राबवून सोपस्कार पूर्ण केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर लावलेले प्रत्येक झाड वटवृक्ष होऊन प्रत्येकाला सावली देईल हे वास्तव खऱ्या अर्थाने कृतीतून युवा संघर्ष सामाजिक संघटना पिपंरी मेघे यांनी वैराग्यमूर्ती थोर समाज प्रबोधनकार संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या पर्वावर करून दाखविले.

झाडाला कीड, वाळवी तसेच कीटकांचा संसर्ग होऊ नये यासाठी प्राकृतिक चिकित्सा पद्धतीने झाडाच्या बुंद्यावर उपाय योजना केल्या गेल्या आहे. प्रत्येक झाड हे बोलकं झालं.की माझं महत्व काय? हे अधोरेखित करणारे प्रभोधनपर फलक सुद्धा यावेळी झाडावर लावन्यात आले. अनेकाकडून आरोप होतो की भीषण अपघातासाठी रस्त्याच्या कडेला असलेले झाड कारणीभूत ठरतात. परंतु वास्तविकता वेगळीच असते..! हाच मुळ उद्देश आणि गाभा हा युवा संघर्ष सामाजिक संघटना यांनी अति जास्त बुद्धीवान मानवी समाजास पटवून दिले.याकरिता धोका सूचना फलक म्हणजेचं रिफ्लेक्टर झाडावर लावण्यात आले. आर्वी नाका ते जुना पाणी चौक पर्यंत रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाच्या सालिवार बोर्डो मिश्रण च्या साह्याने रंगरोटी, सूचना फलक, दिशादर्शक लावून संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाज कार्यास वाहून घेणाऱ्या युवा संघर्ष सामाजिक संघटनेचे सर्व स्तरावरून कौतुक केल्या जात आहे.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940