How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » विज्ञान युगात जादूटोणामुळे वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात?

विज्ञान युगात जादूटोणामुळे वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात?

????खवले मांजर या प्राण्याची तस्करी करणारी टोळी वन विभागा च्या ताब्यात.
????तंत्र मंत्राच्या बाजारात कोट्यावधी रुपयाची उलाढाल या मांजरासाठी होत.

वर्धा : विज्ञानाच्या युगामध्ये काही लोक अंधविश्वास पसरवतात अश्यातच काही दिवसा अगोदर सेलू तालुक्यात वन्य प्राण्याची तस्करी करणाऱ्या वर वन विभागाने व पोलीस प्रशासनाणे कारवाई करत मांडूळ जातीच्या पाच सापांना जीवनदान दिले. गुप्तधन, जादू्टोना, मंत्रशक्ती अश्या अंधश्रद्धांच्या आहारी जाणाऱ्या श्रद्धाळू लोकांभोवती अद्याप आवळत चालला असल्याच्या घडामोडी आहेत. त्यात जीव जातो तो मुक्या निष्पाप प्राण्यांचा असे असताना खवले मांजर या प्राण्याची तस्करी करणारी टोळी पकडल्या गेली आहे. तंत्र मंत्राच्या बाजारात कोट्यावधी रुपयाची उलाढाल या मांजरासाठी होत असल्याचे सांगण्यात येते.वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई व त्यांची अमरावती येथील शाखा तसेच वर्धा वन विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

पुलगाव वन क्षेत्रात ही कारवाई झाली असून एक जिवंत खवले मांजर व सहा आरोपीना कारसह ताब्यात घेण्यात आले. अमरावतीचा नफिर उर रहमान, देवळी तालुक्यातील आगारगावचा पक्षराज फेतराज पवार, पुलगाव येथील मोहम्मद अनिस व गुरुबचनसिंग सागरसिंग बावरी, आगारगावचा संकेत पंकज चव्हाण अमरावतीचा साई नगर येथील अहमदखान अशरफखान या आरोपी ना ताब्यात घेतले आहे . या कारवाई करिता उपवनरक्षक हरवीर सिंग, सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, जी एस. कावळे, यू. व्ही. शिरपूरकर, जी. जी. जाधव, एम. एस. माने, गिरीश गायकवाड व वनविभाग चमुने ही कारवाई केली आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This