How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » श्री संत गजानन महाराज देवस्थानातील चांदी चे दागिने परत.

श्री संत गजानन महाराज देवस्थानातील चांदी चे दागिने परत.

वर्धा : येथील सुप्रसिद्ध श्री संत गजानन महाराज देवस्थानातील दागिने परत मिळाले आहे. दि. 4 मार्च ला सायंकाळी देवस्थान समितीच्या पार पडलेल्या सभेत देवस्थानातील दागिने व्यवहार करण्याची जबाबदारी घेणारे, मात्र त्याचा हिशेब न देणारे देवस्थान पदाधिकारी शालिग्राम तिबडीवाल यांची संस्थेतून काढण्या चा ठराव घेण्यात आला. हा ठराव देवस्थानात पदाधिकारी असलेले उद्योजक प्रवीण हिवरे यांनी मांडला. त्यास आध्यात्मिक प्रवचनकार डॉ. नारायण निकम यांनी अनुमोदन दिले .


वर्धेतील गजानन महाराज मंदिरातील जुने दागिने विकून त्या मोबदल्यात महाराजांच्या मूर्तीसाठी चांदीचा टोप तयार करण्याचे सर्व संचालक मंडळानी ठरविले होते . ही जबाबदारी विश्वस्त असलेले वर्धेचे व्यापारी शालिग्राम तिबडीवाल यांनी स्वीकारली. मात्र तीन वर्षे लोटूनही टोप आलाच नाही. म्हणून चांदीचे काय झाले, या बाबत विचारणा केली असता उडवाउडवी ची उत्तरे टिबडीवाल यांच्या कडून मंदिरातील संचालक मंडळाला मिळाल्याची व याबद्दल भाविकांन मध्ये चर्चा रंगून लागली . असे असताना मंदिर संचालकांची शहरभर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा झाल्याने. याबाबत सर्व संचालक मंडळा ला आता पुढे काय, असा प्रश्न विश्वस्त मंडळीस पडला असता . तेव्हा डॉ. नारायण निकम यांनी तीन दिवसात दागिने परत अथवा पोलीस प्रशासनात तक्रार अशी शेवट ची भूमिका घेतली. असे असताना शेवटी आज ४ मार्चला कार्यकारिणी सभा बोलावत . अध्यक्ष मोहन अग्रवाल व संचालक डॉ. निकम, प्रवीण हिवरे, शेखर शेंडे, नाना पहाडे, सुशील व्यास व अन्य संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी कोषाध्यक्ष व्यास यांनी टीबडीवाल यांनी १ किलो ९७० ग्रॅम चांदी चे दागिने व्यास यांना आणून दिली आहे, असे नमूद करीत सभेत ही चांदीची भांडी जमा केली. सर्वांच्या देखरेखित ते दागिने देवस्थान तिजोरीत जमा करण्यात आली. चांदी परत मिळाली, पण या प्रकरणात देवस्थान समितीची जी बदनामी झाली, असल्याने ही चांदी जवळच ठेवणारे संचालक शालिग्राम तिबडीवाल यांची संस्थेतून काढण्याची भूमिका पुढे आली. अध्यक्ष मोहन अग्रवाल यांनी टीबडीवाल यांची पाठराखण केली. मात्र उर्वरित संचालक मंडळा चे बहुमत आल्याने ठराव मंजूर केला, अशी माहिती प्रवीण हिवरे यांनी दिली. बहुमताने घेतलेला ठराव मान्य होतो, असे ते म्हणाले. डॉ. निकम यांनी, चांदी परत मिळाली, हे महत्त्वाचे. या ठरावाची प्रत धर्मादाय आयुक्त कार्यालयास पाठवली जाईल असे सांगण्यात आले.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This