How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » पाच नद्यांच्या जलपूजनाने जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन- 16 ते 22 मार्च कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन.

पाच नद्यांच्या जलपूजनाने जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन- 16 ते 22 मार्च कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन.

वर्धा दि. 19 : निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयात दि.16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन बजाज फाऊंडेशन जिल्हा समन्वयक ऋषीकेश हरदास यांच्या हस्ते वर्धा, वेणा, धाम, यशोदा व बोर या पाच नद्यांच्या जलपूजनाने करण्यात आले.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निम्न वर्धा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश शर्मा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन निम्न वर्धा कालवे र.र. हरणखेडे विभागाचे कार्यकारी अभियंता, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नि.न.गुप्ता, उपकार्यकारी अभियंता श्री. भालेराव, प्रकल्प समन्वयक विनेश काकडे यांची उपस्थिती होती.
ऋषीकेश हरदास यांनी जिल्हयामध्ये बजाज फाउुंडेशनच्यावतीने पाण्यासंबंधीत कार्य,नदी नाले खोलिकरण,भुगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग सारख्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगून पाणी वाचवा पर्यायी जिवण वाचवा, अशाप्रकारे पाण्याचा मानवी जिवणातील महत्वाबाबत मार्गदर्शन केले.
राजेश शर्मा यांनी वापर संस्था सक्षमीकरणा संदर्भात विभागाची भुमिका सिंचन व बिगर सिंचन पाणी पट्टी वसुली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी नागरिकांमध्ये जलजागृती पर जनजागृती व पाण्याचे महत्व मनामनामध्ये रूजविण्यासाठी जलप्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक. धर्मविर शंभरकर यांनी केले कार्यक्रमाचे संचालन सपना ठमके, यांनी तर आभार पुजा अंभोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी सहकार्य केले.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This