How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने स्थापन केलेली समिती नागपुरात दाखल. पोलिस ॲक्शन मोडवर?

दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने स्थापन केलेली समिती नागपुरात दाखल. पोलिस ॲक्शन मोडवर?

नागपूर : नागपुरातील दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने स्थापन केलेली समिती शनिवारी शहरात दाखल झाली. मात्र, नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी समितीला दंगलग्रस्त भागात जाण्यास मनाई केली आहे.
पोलिसांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना याबाबतचे पत्र दिले असून दंगलग्रस्त भागात गेल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पाहणीची परवानगी मागण्याचे नियोजन केले आहे.
सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने महाल, गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा आणि चादर जाळण्यात आली. त्यानंतर मध्य नागपुरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन दंगल झाली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी रात्रीपासून दंगलग्रस्त भागात संचारबंदी जाहीर करण्यात आली. महाल, इतवारी, गांधीबाग, लकडगंज, कोतवाली परिसरातील बाजारपेठांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. गांधी गेट, महाल चिटणीस पार्क चौक परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.
या समितीमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर आणि आमदार साजिद पठाण यांचा समावेश आहे. नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडधे हे समन्वयक आहेत

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This