सुरु असलेल्या वाळू चोरीवर शासनाचे अधिकारी का दुर्लक्ष करीत आहे हे समजायला मार्ग नाही.
ट्रक मालकांवर किती दिवसात गुन्हे दाखल होणार कि नाही या बाबत अल्लीपूर ठाणेदारांचे मोन.
वर्धा : हिंगणघाट तालूक्यातील शेकापूर वाळू घाट डेपोच्या आडून सर्रास रात्री 10.00 वाजता नंतर वाळू उपसा केला जात आहे. मागील दोन तीन दिवसा पासून हा प्रकार सर्रास सुरु असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे. आता सुद्धा अश्याच प्रकारची वाळू तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात वाळू पुरविण्याचा शासनाचा हेतू हे असले वाळू माफिया पायदळी तुडवीत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनी केलेल्या कारवाईत वाळू चोरी करित असलेले ट्रक पकडण्यात आले होते असे असताना ट्रक मालकांवर कोणत्याही प्रकार चा गुन्हा चार दिवस होऊन सुद्धा नोंद झाला नसल्याचे सूत्रच्या माहिती नुसार समजले व गोर गरीब रोज मजुरी करणाऱ्या वाहन चालकावर कर्तव्यदक्ष अधिकारी डाहुले साहेब यांनी गुन्हा नोंद करण्याचे आपल्याला कर्मचाऱ्यांना सांगितले असल्याचे बोलले जात आहे.वाहन मालकानं मध्ये कित्येक ट्रक मालक हे वर्ध्यातील असून त्यांच्या वर कारवाई का नाही हा विचार करणारा प्रश्न आहे. कारण शासन वाळू तस्करीवर आळा घालण्यास असमर्थ ठरत आहे का? अवैध्य वाळू माफियावर कारवाई झाली नाही तर, येणाऱ्या पुढील बातमी मध्ये ट्रक मालकांचे नावे प्रकाशित करण्यात येईल . व त्या नंतर अल्लीपूर चे साहेब काय कारवाई करता ? हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर घाटा मध्ये मोठया प्रमाणात बोटी व पोकल्याण्ड द्वारे वाळू उपासली जाते ही सुद्धा माहिती सूत्र द्वारे आहेम्हणून या प्रकरणाला राजकीय वलय असणारे नेते व पुढारी यांची वाळूचे वाळू उपसा करण्यासाठी हा आहे का? क्रमश :2
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940