तळेगाव शामजीपंत:- येथील मॉडेल हायस्कूल येथील शाळेच्या गेटला आज सकाळपासूनच कुलूप असल्याने सर्वांना एकच धक्का बसला कारण आज शाळेचा पहिला दिवस असल्याने पालकमंत्र्यापासून तर आमदार खासदार पर्यंत सगळ्यांनी विशालेश विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरता आपापल्या परिसरातील शाळा गाठल्या होत्या व विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करत त्यांना शालेय पुस्तके गणवेश बूट तसेच गोड पदार्थात सुद्धा दिले होते शालेय शिक्षण शिकता शिकत असताना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी या विद्यार्थ्यांचे मनोभावे स्वागत या सर्व मान्यवरांचे हार्दिक करण्यात आले होते परंतु काही शिक्षण संस्था या तशाच बंद अवस्थेत होत्या शिक्षक शाळेमध्ये आले होते परंतु शाळेच्या गेटला कुलूप होते शिक्षण संस्था चालकांनी शाळा बंद ठेवण्याचे आज संबंधित मुख्याध्यापकांना आदेश दिल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे नंतर लक्षात आले संच मान्यता रिक्त पदे भरणे अनुदानाची पूर्तता करणे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्तता करणे संदर्भात हा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे तळेगाव येथील अनुदानित खाजगी शिक्षण संस्थेच्या निर्णयामुळे मोठे खळबळ उडाली होती व पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी हे शाळेला मुकले असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते एकीकडे पालकमंत्री पंकज भोयर यांनी स्वतः शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले तर दुसरीकडे शिक्षण संस्था चालकांच्या या अशा प्रकारामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी शाळेला मुकल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला होता
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940