How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » पुलगाव नगर परिषद च्या मुख्याधिकारी ने सफाई कामगार ला का केले असेल शिक्षक!

पुलगाव नगर परिषद च्या मुख्याधिकारी ने सफाई कामगार ला का केले असेल शिक्षक!

????मुख्याधिकारी शिक्षका चा
आदेश करताना साखर झोपेत.

????नगर परिषद प्रशासनातील ध्रुठराष्ट्र कोण याची पण चौकशी व्हायला हवी.

वर्धा : शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या जिल्ह्यात शिक्षक नसल्याने सफाई कामगार शिक्षक म्हणून जागा भरल्या जात असल्याचे पुलगाव मध्ये पाहावे लागत आहे.

पुलगाव नगर परिषदेच्या शाळेत हा प्रकार दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. पुलगाव नगर परिषदेच्या शहीद भगतसिंह प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक शंकर जाधव यांची बदली पुलगाव नगर परिषदेच्याच राणी लक्ष्मीबाई प्राथमिक शाळेत करण्यात आली. त्यांची जागा रिक्त झाल्यामुळे जाधव यांच्या जागेवर कोणास नेमायचे याचा पेच निर्माण झाला. तेव्हा नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारऱ्याने त्या रिक्त जागेवर चक्क सफाई कामगार नियुक्त केला. नगर परिषद अधीनस्त स्वच्छता विभागातील सफाई कामगार रमेश चंडाले यांची अध्यापनासाठी नियुक्ती करण्यात येत आहे, असा आदेश काढण्यात आला.

हा आदेश चक्रावून टाकणारा ठरत आहे. कारण शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेत आवश्यक शैक्षणिक पात्रता असणारे नियमित शिक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. तसेच ज्या शाळेतून बदली करण्यात आली, त्या शाळेत आवश्यक ती पटसंख्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे बदली अयोग्य ठरते.

*राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे म्हणतात की, हा प्रकार अनाकलनीय आहे. शिक्षण सेवकाची बदली करीत त्या जागेवर सफाई कामगार अध्यापणासाठी नियुक्त करण्याची बाब अफलातून म्हणावी लागेल. शिक्षकाऐवजी सफाई कामगार किंवा अन्य संवर्गातील नियुक्तीचे कसे समर्थन करणार. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सफाई कामगार नियुक्ती आदेश त्वरित रद्द करावा. तसेच पात्र शिक्षकांची लगेच नियुक्ती करावी, अशी संघटनेची मागणी असल्याचे विजय कोंबे म्हणतात*.

संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन जबाबदारी असणाऱ्या उपजिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देत लक्ष वेधले आहे. तसेच राज्य शिक्षण आयुक्तांना याबाबत सूचित केले अशी माहिती आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This