How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » ग्रामसेवा मंच पिपरी (मेघे )पिपरी (मेघे )वर्धा ग्राम रहिवाशी कडून स्पीड ब्रेकरची मागणी.

ग्रामसेवा मंच पिपरी (मेघे )पिपरी (मेघे )वर्धा ग्राम रहिवाशी कडून स्पीड ब्रेकरची मागणी.

आर्वी रोड वरील डॉ. शाहू हॉस्पिटल तसेच झाडे यांच्या घरापासून ते कारला चौक पर्यंत दोन्ही बाजूने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने गतिरोधक म्हणजेच स्पीड ब्रेकर लावण्याबाबत.

ग्रामपंचायत पिपरी (मेघे )अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग आर्वी रोड वरील वाहत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले आहे. तसेच या मार्गावर पाच मंगल कार्यालय असून या मार्गावर अनेक शाळा व कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने सुसाट वेगाने वाहने धावत असतात, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.तेव्हा वाढती लोकसंख्या लक्षात घेता आर्वी रोडवरील डॉ.शाहू हॉस्पिटल तसेच झाडे यांच्या घरापासून ते कारला चौकापर्यंत दोन्ही बाजूने सर्विस रोड पाहून गतिरोधक बसवणे फारच गरजेचे झालेले आहे. याबाबत ग्रामपंचायत व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब, कार्यालय वर्धा व ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना गतिरोधक स्पीड ब्रेकर लावण्यासाठी तातडीने कारवाई करावी. हिचं नम्र विनंती पिंपरी (मेघे) सर्व ग्रामवाशाची मागणी आहे .
यामध्ये ग्रामसेवा मंच पिपरी मेघे अध्यक्ष प्रकाश तायडे, उपाध्यक्ष विजय घोडे, कोषाध्यक्ष दिलीप वानखडे ,महासचिव मिलिंद सिरसोदे,सहसचिव वसंत पिंपळे, अरविंद आगलावे, सुभाष तिखे,प्रेमदास बनसोड, राष्ट्रपाल गणवीर,अजय मुरडीव, इत्यादी निवेदन देतांनी उपस्थित होते. आपला नम्र :प्रकाश तायडे (अध्यक्ष )ग्रामसेवा मंच पिपरी (मेघे ).

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This