???? मुख्याधिकारी व लोहवे, पेटकर विरोधात घोषणाबाजी.
???? पोलिसांनी आत्मदहनाचा डाव फसला.
वर्धा (सचिन ओली ): शहरात गेल्या महिन्याभरापासून नगरपरिषदेने अतिक्रमण विरोधात अतिरेक व अन्यायकारक कारवाई करत फूटपाथ विक्रीत्यावर उपासमारीची वेळ आणली आहे. नगरपरिषदेच्या अतिक्रमांच्या नावावर जुल्मी अत्याचार आम्ही सहन करत आहोत पण आता आमच्या मुलं बाळाच्या शिक्षणाचा आरोग्याचा आणि जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या निगरगठ नगर परिषद प्रशासनाला व मुख्याधिकारी आणि कर्मचारी नितीन लोहवे व पेटकरे यांच्या ज्याच्याला कंटाळून वर्धा शहरातील अतिक्रमणच्या कारवाईला ग्रस्त होऊन सर्व दुकानदार यांनी सहपरिवार आत्मदहनाचा पवित्र 1 ऑगस्टला आजमावला आहे.
त्यामुळे आज वर्धा नगरपरिषद परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही लावण्यात आला होता तरी ही आसिफ खान यांनी नगरपरिषद प्रशासनाला जाग यावा म्हणून नगरपरिषद परिसरातील मुख्यद्वारा जवळ अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु उपस्थित पोलीस कर्मचारी कमलेश बडे यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला व आसिफ खान यांना लगेच ताब्यात घेतले.
तेव्हा उपस्थित सर्व दुकानदारांनी नगर परिषदेच्या निषेधार्थ घोषणाबाजी देऊन आसिफ खान यांचे समर्थन केले त्यानंतर शहर पोलीस स्टेशन येथे आसिफ खानला नेण्यात आले सर्व फुटफाट दुकानदारानी पोलीस स्टेशन गाठून आम्हाला पण ताब्यात घ्या ही विनंती पोलीस अधिकाऱ्यांना केली असल्याचे सांगण्यात आले.
*वर्धा नगरपरिषद ने गेल्या महिन्यापासून फुटपाट वरील छोट्या दुकानदारांना अन्न असं निवाऱ्यापासून दूर ठेवायचे काम काही धनधाकट्या व्यापाऱ्याच्या म्हणण्यावरून प्रशासनाशी आर्थिक संबंध जोपासत आम्हाला बाजारातून उठवण्याचे आसिफ खान यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले*.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940