वर्धा, दि. ११ नोव्हेंबर –
वर्धा जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुक पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने दिनांक 10 नोव्हेंबर रोजी नगर पालिका प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे आप पक्षाचा अधिकृत “A” फॉर्म वर्धा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या नेतृत्वात दाखल करण्यात आला.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या नावांसाठी आवश्यक असलेला “A” फॉर्म जमा करून निवडणूक प्रक्रियेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टी शहरातील मूलभूत सोयी, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर केंद्रित निवडणूक प्रचार करणार आहे.
त्याचबरोबर भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि नागरिकांच्या थेट सहभागावर आधारित निर्णयप्रक्रिया राबवण्याचा निर्धार आम आदमी पार्टीचा मुख्य अजेंडा राहणार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांनी व्यक्त केले.
“A” फॉर्म दाखल करताना जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड, आप चे नेते मंगेश शेंडे, जिल्हा सह सचिव खालिद खान, शहर अध्यक्ष कुणाल लोणारे, शहर उपाध्यक्ष शाहरुख पठाण, शहर सचिव मयुर राऊत, पंकज राऊत, आवेश पठाण व कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940