How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » सामान्य रुग्णालयात आढळून आलेले मृत अर्भर बाहेरून आल्याची शक्यता : रुग्णालय प्रशासन!

सामान्य रुग्णालयात आढळून आलेले मृत अर्भर बाहेरून आल्याची शक्यता : रुग्णालय प्रशासन!

वर्धा. (टीम विदर्भ संदेश)दि.29 : सामान्य रुग्णातील प्रसाधनगृहात आढळून आलेले मृत अभ्रक रुग्णालयातील नसून बाहेरुन आले असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा खुलासा सामान्य रुग्णालयाच्यावतीने करण्यात आला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाजवळील प्रसाधनगृहामध्ये दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता मृत अर्भक आढळून आले. सफाईगार सिमा मोरे यांनी ते पाहिले त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांना तात्काळ या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करुन वर्धा शहर पोलिस स्टेशनला कळविले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर बालकाला पीएम विभागात ठेवण्यात आले.
सदर बाबीची तपासणी चमूद्वारे करण्यात आली. यामध्ये एनसी वार्डामध्ये 16 गरोदर माता होत्या, तसेच त्यांचे एकुण 9 बालके मातेजवळ व 7 बालके एसएनसीयूमध्ये भरती होते. या वार्डातील सर्व बाळ सुरक्षीत आढळून आले. पीएनसी वार्डामध्ये एकुण 12 माता व त्यांचे 12 नवजात बालके भरती होते. याबाबतची पडताळणी केली असता सर्व बाळ सुरक्षित आढळून आले. केएमसी वार्डमध्ये एकुण 3 माता व 3 नवजात बालके एनएनसीला भरती असलेले सुरक्षित आढळून आले.
लेबलरुम मध्ये एकुण 5 माता व 5 बालके व त्यांची 5 नवजात बालके तसेच एलएससीएसच्या एकुण 2 माता व त्यांची 2 बालके भरती होते. तपासणीमध्ये ते सर्व सुरक्षित आढळून आले. अपघात विभागातील बाह्यरुग्ण विभागातील 13 गरोदर माता तपासणी करुन गेल्यात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक माता स्वत:च्या इच्छेने सावंगी मेघे येथील रुग्णालयात भरती झाली. तेथे तिचे सिझरीयन झालेले असून तिला मुलगी जन्माला आली असल्याचे आढळून आले.
यासर्व तपासणीमध्ये रुग्णालयातील सर्व बालके सुरक्षित असल्याचे आढळून आले असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात सापडलेले मृत अर्भक हे रुग्णालयातील नसून ते बाहेरुन आल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रुग्णालयातील गठीत करण्यात आलेल्या वैद्यकीय चमूनी अर्भकाचे शवविच्छेदन केले असता शवविच्छेदनामध्ये मृत बालक पुरुष जातीचे असून त्याचे डिएनए चॅम्पल घेण्यात आले आहे. तसेच पोलिस विभागाकडून या संदर्भात तपास सुरु असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी कळविले आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This