How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!19 लाख 20 हजाराची अवैध दारू जप्त

वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!19 लाख 20 हजाराची अवैध दारू जप्त

वर्धा (टीम विदर्भ संदेश): जिल्ह्यात येताच पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येते. ३१ डिसेंबर च्या निमित्ताने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना अवैध धंद्यांवर, विशेषतः लक्ष देण्याचे आदेश दिले आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यावर विशेषतः जास्त प्रमाणात लक्ष देऊन कारवाई करण्याचे पण आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिल्याची माहिती आहे.

याच सूचनांच्या अनुषंगाने, दि. 29/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एकूण 18,19,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. 29/12/2025 रोजी गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संत कबीर वार्ड, हिंगणघाट
येथील एका दुकानांमध्ये सिने स्टाईल छापा टाकला असता, आरोपी आकाश उर्फ टिन्या गवळी रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट . व आरोपी अमरदिप उर्फ बॉंब जिवणे रा. चंद्रपुर, ह.मु. संत कबीर वार्ड हिंगणघाट. हे अवैध देशी व विदेशी दारूचा साठा करून ठेवलेल्या दुकानांमध्ये रेड केला असता आरोपी पोलिसांची चाहूल लागताच आरोपी आकाश उर्फ टिंन्या मोक्यावरून पळून पसार झाला.
जप्त केलेला मुद्देमाल खालील प्रमाणे आहे.

देशी दारू प्रीमियम डिलक्स सुपर संत्रा कंपनी (90 एम.एल.) 3350 शिशा, 3,35,000/- रुपये
टंगो पंच कंपनी (90 एम.एल.) 1880 शिशा, 1,88,000/- रुपये
देशी दारू कोकण प्रीमियम नं. 01 (90 एम.एल.) | 1800 शिश्या, 1,80,000/-रुपये ,
देशी दारू भिंगरी संत्रा कंपनी (90 एम.एल.) 500 शिश्या 50,000/-रुपये , रॉकेट देशी संत्रा कंपनी (९० एम.एल.), 300 शिश्या | 30,000/-रुपये ,
आर एस कंपनी (2000 एम.एल.), 12 बंपर | 36000/-रुपये ,
एक प्लास्टिक कॅरेट किंमत 500/- रु. आणि चार चाकी वाहन
| महिंद्रा स्कॉर्पियो कार (MH-20-DJ-4740) | १ नग | 10,00,000/- रुपये
एकूण किंमत | | 18,19,500/-
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अशी कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी यांच्या सूचनेनुसार पो.उपनि. ओमप्रकाश नागापुरे, पो.हवा.अमर लाखे, धर्मेंद्र अकाली, रोशन निभोरकर ,दिपक जंगले,पवन पन्नासे, पो.अं. मुकेश ढोके, प्रफुल पुनवटकर, हर्षल सोनटक्के, रितेश कुऱ्हाडकर, राहुल लुटे सर्व नेमणुक – स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This