????वर्धा नगरपरिषद ने खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास बंदी घालावी.
???? खर्रा खाऊन थुकल्यास दंडात्मक कारवाई करावी.
वर्धा( सचिन ओली ) : महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा वर्धा व सेलू विधानसभा चे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी त्यांच्या कार्यकाळात वर्धा मध्ये भरभरून विकास निधी आणला आहे. असे असताना या निधी मधून लाखो रुपये शहरातील सुंदर अशी रंग रांगोटी व स्टील रेलिंग चे विकास कामे करण्यासाठी निधी वापरण्यात आला आहे. वर्धा नगरपरिषद च्या शहर हद्दीत काही दिवसा अगोदरच रंगरंगोटी चे कामं पूर्ण झाले.







त्या मुळे वर्धा शहराचा सुदंर असा कायापालट झाला आहे अशे असताना काही लोकांना ते बरे दिसत नसल्याचे असे दिसून येते याचे कारण म्हणजे वर्ध्यात पानमसाला व खर्रा खाणारे *मूर्ख* जानी या रंग रांगोटी वर आपला खर्रा खाऊन तोंडातून पिचकारी मारून रंग रांगोटी ला बे-रंग केल्याचे दिसत आहे तरी नगरपरिषद यांनी केलेल्या रंगरंगोटी चे खर्रा खाणाऱ्यांनी
तीन तेरा वाजून ठेवले असे दिसून येते पण याकडे नगर परिषद प्रशासना चे दुर्लक्ष आहे. नगर परिषद प्रशासनाला विकास बरा दिसत नाही कि लोकांना या बद्दल संभ्रम आहे. या मुळे नगर परिषद या पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या वर काही कारवाई करत का नाही हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. कि येवढा निधी खर्च करून जर अश्या प्रकारचे कृत्य कोणी करत असेल तर यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई नगर परिषद ने करावी अशी मागणी सोशल मीडिया वर सद्या सुरु आहे. या करिता पान टपरी चालकांना किंवा पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर प्रशासनाने कारवाई का नाही करावी.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3261
Total views : 4945