How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » जागतिक चिमणी दिवसाचे अवचित्य साधत पाणी पात्राचे वाटप.

जागतिक चिमणी दिवसाचे अवचित्य साधत पाणी पात्राचे वाटप.

वर्धा : पिपरी मेघे येथील वॉर्ड नं 4 दुर्गा माता मंदिर या ठिकाणी बहर नेचर फाउंडेशन व युवा संघर्ष सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिवसानिमित्त पाणी पात्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रा किशोर वानखडे, राजदीप राठोर युवा संघर्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष उमेश खांडेकर , शारदा केणे, प्रमोद ठकरे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक गुढेकर यांनी केले तर पर्यावरणाचा होणारा बदल व पक्ष्यांचे सद्यस्थिती यावर माहिती प्रा.किशोर वानखेडे यांनी दिली पक्षी अभ्यासक दीपक गुढेकर यांनी पीपीटी च्या माध्यमातून पक्षांच्या प्रजाती व त्यांची निवासस्थाने याबद्दल विस्तृत माहीती दिली. त्यानंतर पक्षांकरिता पाणीपात्रांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वितेकरता गजानन भातुकुलकर. आनंद धामणकर, गजानन वानखेडे, सुधीर वसु, महेंद्र लोखंडे, यशपाल कदम, कोटंमकर , रमेश आंबटकर,भिसे, कोदरे, मनोहर चांदुरकर, योगीराज दाते, भरत मुडे, मरसकोल्हे,विद्या सोनटक्के, मेघा गुढेकर, स्वाती ढुमणे, गहूकर , आरती पांजळे घुसे,तसेच मोठ्या संख्येत परिसरातील नागरीक उपस्थित होते संचालन देवर्शी बोबडे तर आभार अविनाश जाधव यांनी मानले .कार्यक्रमा करीता संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This