???? पहिल्याच पावसाच्या पाण्यात पुलाला पडल्या मोठ्या प्रमाणात भेगा.
???? कंत्राट दाराचे मुजोरी तर प्रशासनाची हतबलता
???? शेतकऱ्यांच्या शेतात कंत्राटदाराने लावले माती मिश्रित मुरमाचे डिगारे
वर्धा :सेलू तालुक्यातील तळोदी येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत डांबर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे सदर रस्त्याचे बांधकाम मागील काही महिन्या पहिलेच पूर्ण झाले आहे. पण येणाऱ्या पावसाच्या पाण्याने हा रस्ता अक्षरशा उखडून गेलेला आहे रस्त्याच्या बाजूने असलेल्या नाल्यातीलच माती खोदून तिचाच मुरूम म्हणून ठेकेदाराने पुलामध्ये वापरल्याचे मोक्यावर दिसून येते.

डांबर रस्त्यावरील पुलावर अक्षरशः मोठ्या प्रमाणात भेगा पडलेले आहे व पूल खसलेला आहे काही वेळ जर जास्त प्रमाणात नाल्याला पावसाचे पाणी आले तर रस्ता वाहून जाईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. या पूर्ण रस्त्यावर अश्याच प्रकाचे नित्कृष्ट दर्जाचे काम पहायला मिळते कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करण्या करता कोण पाठबळ देत हे या रस्त्याच्या गुणवत्ते वरून दिसून येते कंत्राटदाराने रस्त्यातील माती मिश्रित मुरून टाकल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पुलाला भेगा पडलेल्या कळताच स्वतः सेलू ठाणेदार व मौज्यातील तलाठी आणि पोलीस पाटील यांनी सदर ठिकाणी पाहणी केली आहे पण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या एकाही अधिकाऱ्यांने त्या ठिकाणी जाऊन
मौका चौकशी केलेली नाही ही लाजिरवाणी बाब आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांन मार्फत हाताची घडी व तोंडावर बोट याप्रमाणे गेल्या महिन्यात काम पहाण्याची तक्रार गावकऱ्यांची आहे तर कंत्राटदाराशी असणाऱ्या आर्थिक हित संबंधामुळे तर याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे तर नाही ना असे दिसून येते तरी या प्रकरणाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता ग्राम सडक योजना यांनी लक्ष द्यावे ही ग्रामस्थांची मागणी आहे प्रकरणाची चौकशी करून मुजर नागपूरचा कंत्राटदार राजेंद्र मेश्राम याला काळ्या यादीत टाकून याची रक्कम थांबवावी ही माजी सरपंच व नागरिकांची मागणी आहे सदरच्या कामाची गुणवत्ता तपासणी करून कंत्राटदाराकडून जर कोणत्याही प्रकारची रस्त्याच्या कामातील रक्कम दिली असेल तर त्याला दंडलावून वसूल करावी ही ग्रामस्थांची मागणी आहे.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3261
Total views : 4945