How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » पिपरी त नवा गडी नवा राज का?

पिपरी त नवा गडी नवा राज का?

वर्धा :
संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आत्ता नगरपरिषदेची निवडणूक जाहिर झालेली आहे अश्यातच जिल्ह्या मध्ये पिपरी मेघे जिल्हा परिषद सर्कल चर्चे चा विषय असतो.कारण या जिल्हा परिषद सर्कल मध्ये नेहमी शिंदे विरुद्ध गौळकार असा सामना रंगलेला दिसतो पण या वेळी चित्र थोडं वेगळं असल्याचे दिसून येते कारण ग्रामपंचायत निवडणूक मध्ये जे शिंदे सोबत होते ते आत्ता विरोधात गेल्याचे दिसत आहे काहींनी वेगळी संघटना काढली तर काही गौळकर तर काही माजी जिल्हा परिषद सदस्य च्या हाती लागले आहे. शिंदे विषयी जुने सहकारी नाराज आहे असल्याच्या चर्चा सध्या पिपरी मेघे मध्ये सुरु आहे. ज्या ज्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक हातात घेऊन रक्ताचे पाणी केले त्यांना शिंदे नी दुरावले व ज्यांनी शिंदे च्या विरोधात ग्रामपंचायत मध्ये कामं केले त्यांना जवळ केल्याची चर्चा आहे. हाच फटका शिंदे ना या निवडणुकीत लागणार अस वाटत आहे. नेहमी प्रमाणे त्यांची निवडणूक झाली कि ऐ कला चलो ची भूमिका असते. त्यामुळे काँग्रेस चे स्थानिक कार्यकर्ते नाराज आहे या मध्ये काँग्रेस शी नाळ जुळलेले इखार, राजूरकर,वसू, ,यांनी वेळी भूमिका घ्याचे ठरवले आहे. मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी मध्ये शिंदेन सोबत राजेश राजूरकर व प्रफुल्ल मोरे विजयी झाले होते. पण त्या नंतर हे तिघेही वेगवेगळ्या दिशेने जाण्यास आपला मार्ग शोधत होते कोणी जिल्हापरिषद सभागृहात भाजप बरोबर बसून पिपरी मेघे चा सर्वांगीण विकास करत होता तर कोणी स्वतः चा विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांना आपल्या पदाचा पावर दाखवत पण पिपरीतील मतदारांना मात्र फक्त गौळकर म्हणजे विकास हा च परियाय दिसत. अश्यात जिवाभावाचे मित्र असलेले ज्यांनी ग्रामपंचायत निवडणूक डोक्यावर घेतलेले असे सुमित ठवळे, विशाल चौधरी व अनिकेत भोयर हे पण भाजप च्या माजी जिल्हा परिषद सदस्य च्या हाती लागले. या मुळेपिपरी मेघे चे वातावरण सध्या बद्दलत असल्याचे दिसून येत आहे जवळच्या च मंडळी नी दुरावा निर्माण केला तर पिपरी मेघेतील नागरिकांनी पण विचार करून च कोणाला येत्या निवडणुकीत पिपरी मेघे च्या विकासा करिता जिल्हा परिषद मध्ये पाठवणार.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This