गावकऱ्यांनी दिला आंदोलन करण्याचा इशारा.
वर्धा जिल्हा/ वर्धा तालुक्यातील महाकाळ या गाव-शिवारा लगत असलेल्या धामनदी पात्रातून अवैध रेती तस्करी करणारे शेत शिवारात येजा करणाऱ्या रस्त्या वरून अवैध रेती ट्रॅक्टर वाहतूक करत असतात.त्या मुळे रस्त्याची अतिशय दुर्दशा होत आहे.
तसेच गावातील शेतकऱ्यांनी मनाई केल्यास मुजोरी करून तुझ्या बापाचा रस्ता आहे का? अशा सवाल ते गावऱ्यास करत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
या संदर्भातील निवेदन आज वर्धा तहसीलदार संदीप फुंडेकर यांना देत अवैध रेती तस्करांच्या मुस्क्या अवरण्याची मागणी केली .
वर्धा पोलीस व महसूल प्रशासनाला याची माहिती असून सुधा ते यावर दुर्लक्ष का करीत आहे.
पोलीस व महसूल विभागाच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू आहे का? असा प्रश्न गावकऱ्याना निर्माण झालेला आहे.
दिवसा ढवळ्या रेती उपसून रेती तस्करीचा प्रकार गावात वाढत आहे.
म्हणून प्रशासनावरील अविश्वास निर्माण आहे असे गावतील नागरिकांन मध्ये चर्चा आहे.
निवेदन दिल्या नंतर मात्र प्रशासन काय भूमिका घेते यावर समस्त गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3271
Total views : 4973