How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » वन्यजीव तस्कराकडे जादुटोणा विरोधी कायदा अन्तर्गत तपास पोलिसांनी करावा-गजेंद्र सुरकार.

वन्यजीव तस्कराकडे जादुटोणा विरोधी कायदा अन्तर्गत तपास पोलिसांनी करावा-गजेंद्र सुरकार.

वर्धा : गेल्या दोन महिन्यांत मुंबई येथील स्टाॅक्स फोर्स वन विभाग वर्धा व वर्धा पोलिस यांनी मिळून मांडून साप खवल्या मांजर जे अघोरी पुजे साठी बळी देण्यासाठी वापरतात त्या तस्करीचा शोध लावून संबधीत गुन्हेगारांना अटक केली ते आज वनकोठडीत आहे या तपासात हे वन्यजीव तस्कराचे जाळे आठ जिल्ह्यांत पसरले असून अधिक तपास केला असता हे वन्यजिव तस्कर पायवर म्हणजे जन्माच्या वेळी आधी पाय बाहेर निघून नंतर संपूर्ण शरीर बाहेर येणे होय असे अपत्य हे तंत्र मंत्र,अघोरी पुजा करणारे धन लपलेले आहे ते शोधण्यासाठी , कुटुंबात गावात काही ब्याद आली आहे.

ती दुर करण्यासाठीही अशा मुलांचा बळी देण्यासाठी वापर करतात अशा लोकांना सतत स्वप्नात धनाचा साठा लपलेला आहे असे स्वप्न पडतात असा गोड समज या तंत्र मंत्र करणा-यांचा असतो या साठी अशा मुला मुलींच्या अथवा पाळी न आलेल्या मुली यांचा शोध घेतला जातो अशी टोळी ते सुचविणारे मांत्रिक हे आजही अस्तित्वात आहे ज्यामुळे अनेक मुला मुलींच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे अशा मुला मुलींचाही गैरवापर करण्या साठी यातील आरोपी सहभागी होते हे तपासात वन धिकारी यांच्या तपासात आणि आरोपीकंडे मिळालेल्या मोबाईल मधून उघडकिस आले आहे.महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम,२०१३ या जादुटोणा विरोधी कायदा अन्तर्गत जे बारा कलम व एक उपकलम आहे त्यात ४ थ्या कलमात आणि कायद्याच्या नावातच नरबळी हा शब्द आलेला आहे व वर्धा शहरातील आर्वी नाका परिसरातील वस्तीतील २०१४ मध्ये नरबळी दिल्याची घटना घटली असतांना या प्रकरणात पोलिसांनी जातीने लक्ष दिले पाहिजे
नरबळी देणे किंवा देण्यासाठी प्रयत्न करने त्यात कोणत्याही कारणाने सहभागी असणे इजा पोहचविणे हा गुन्हा आहे नरबळी किंवा त्या सारख्या प्रकरणात अशा पायवर मुला मुलींचे अपहरण करून त्यांचा अघोरी पुजेसाठी कुटुंबातील अथवा गावावर आलेले संकट दुर करण्यासाठीही अथवा जमिनीतील धनाचा साठा मिळविण्यासाठी कथित काजळीवाल्यांची मदत घेवून बळी दिल्या जातो यासाठी आधी ती धन असलेल्याची समज करून घेऊन आधी मांत्रिकाचा शोध घेतला जातो नंतर काजळी वाला ज्याच्या तळहातावर मंत्राने तयार (कथित)काळा पदार्थ त्याच्या तळहातावर लावून धन कोठे आहे हे शोधल्या जाते नंतर मांत्रिक हे धन काढण्यासाठी पायाळू असलेल्या मुला मुलींचा शोध घेवून कारण असे अपत्य हे आप आपल्या परिसरात प्रसिद्ध असतात अनेक लोक उसण उतरविण्यासाठी यांच्या कडून लात मारून घेतात अशा बालकांना हेरून त्यांना चाॅकलेट, खाण्याचा पदार्थ पैसे याचे लालच दाखवून अथवा बळजबरीने त्यांचे अपहरण करून डांबून ठेवतात अमावस्या किंवा पोर्णिमेच्या दिवशी अशा मुलांना कथित धन लपलेले आहे अशा जागेवर किंवा पुजेसाठी निर्जन स्थानाचा शोध घेवून तिथे नेण्यात येवून त्यांची पुजा केली जाते नंतर अशा मुलांचे रक्त हे धन मागत आहे अशी उपस्थित सर्वांची समज करून देण्यात येवून या मुलांचा गळा कापून ते रक्त त्या स्थानावर शिंपडण्यात येते किंवा पितात तर अनेक वेळा कुटुंबातील किंवा गावातील संकट दुर करण्यासाठीही अशा पायाळू मुलांचा बळी दिल्या गेला असे अनेक उदाहरणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या ३५ वर्षात उघडकिस आणले आहे त्यामुळे या प्रकरणात कुठे बळी दिला गेला किंवा देण्यासाठी या आरोपींनी कुण्या पायाळू मुला मुलींचे अपहरण करून उपयोग केला गेला आहे का, महाराष्ट्रात कुण्या पोलिस स्टेशनमध्ये अशा लहान मुला मुलींचे मिसींग लापता हरविले प्रकरण नोंद आहे का हे तपासण्यासाठी जादुटोणा विरोधी कायदा अन्तर्गत दक्षता अधिकारी म्हणून पोलिस स्टेशन अधिकारी अथवा त्या दर्जाचा अधिकारी यांची नियुक्ती केली आहे त्यांना असा काही संशय आल्यास माहिती मिळाल्यास विना वारंट तपास करण्याचा जप्ती अथवा तपास करता येतो त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने जादुटोणा विरोधी कायद्यात दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून या प्रकरणात लक्ष घालून तपास करून या प्रकरणात लक्ष घालावे व छडा लावावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव व जादुटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार समितीतीचे जिल्हा कमिटीचे सदस्य गजेंद्र सुरकार यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायदा विभागाचे प्रमुख हे राज्याच्या गृह विभागाकडे यासाठी पाठपुरावा करीत आहे

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This